सोशल मीडियावरचे प्रसिद्ध कपल 'प्रसिका'ला का नकोय मूल?|Child Free Trend | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasad-deepika
सोशल मीडियावरचे प्रसिद्ध कपल 'प्रसिका'ला का नकोय मूल?|Child Free Trend

सोशल मीडियावरचे प्रसिद्ध कपल 'प्रसिका'ला का नकोय मूल?

आपल्या समाजात नेहमीच कोणाना कोणाविषयी पूर्वग्रह असायचा शिवाय आव्हानेही होती. पण आता बराच फरक पडला आहे. लोकं (People) त्यांच्या इच्छेनुसार वागत आहेत. सोशल मीडियाच्या (Social Media) वापरामुळे लोकांचा दृष्टीकोन खूप बदलला आहे. लोकं थेट कमेंट करून आपला राग-प्रेम व्यक्त करतात. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या प्रसाद आणि दीपिका (Prasad-Deepika) या जोडप्याबाबतीत असेच घडले आहे. ते 'प्रसिका' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचे फॉलोअर्स प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविषयी चाहत्यांकडून त्यांना सतत प्रश्न विचारले जात आहेत.

हेही वाचा: तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा ५ फायदे

का घेतला निर्णय ( Why Took This Decision?)

काहींनी प्रसिकाला स्वार्थी असे म्हटले आहे. असे असूनही त्यांनी चाईल्ड फ्री असणे ही त्यांच्यासाठी खूप कठीण आणि महत्त्वाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे.. स्वतःचे मूल होऊ देण्यापेक्षा या जोडप्याला नाथ मुलींची काळजी घेणे आणि त्यांची काळजी घेणे ही जबाबदारी असल्याचे वाटते. त्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणे त्यांनी चार मुलींची आर्थिक जबाबदारी स्वीकारली आहे. आणखी अशा अनाथ मुलांची जबाबदारी स्विकारण्यासाठी ते तयार असून शिक्षण आणि उत्तम आयुष्य देण्यासाठी 100 अनाथ मुलींची आर्थिक जबाबदारी उचलण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मुलं आवडत नाहीत म्हणून चाईल्ड फ्री राहण्याचा विचार केला या म्हणण्याला ते विरोध करतात. उलट त्यांचे मुलांवर प्रेम आहे.

हेही वाचा: पालकांनो, तुमच्या अल्पवयीन मुलांना किती स्वातंत्र्य द्याल?

हा निर्णय विवादास्पद का? (Is their decision controversial?)

भारतातील वाढती लोकसंख्या, पर्यावरणाचा प्रश्न, इतर अनेक समस्या बघता अनेक लोकं आता मुलांना जन्म न देण्याचा अर्थात चाइल्ड फ्री राहण्याचा विचार करत आहेत. भारतात हे पाऊल नवे असले तरी अनेक कपल्स गांभिर्याने याकडे लक्ष देत आहेत. जेव्हा तुम्ही सर्व बाजूनी खूप सक्षम असता तेव्हा पालकत्वाचा विचार करता. पण असा चाईल्ड फ्री राहण्यासाठी विशेषत: मातृत्वाचा त्याग करण्यासाठी धैर्याची आवश्यकता असते. ज्या देशात नवविवाहित जोडप्यांना 'गुड न्यूज कधी मिळणार?' असा प्रश्‍न नातेवाईक सतत विचारून भेडसावत असतात, त्या देशात दुसऱ्या मुलांना शिक्षण आणि सर्वोत्तम जीवन देण्यासाठी प्रयत्न करणारी 'प्रसिका'सारखी जबाबदार जोडपी असणे महत्वाचे वाटते.

हेही वाचा: लग्नानंतरची दोन वर्षे का महत्वाची! ही तीन कारणे वाचाच

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social Mediachild news
loading image
go to top