
When is Father’s Day 2025: जगातील सर्वांत साधा माणूस, जो सतत कष्ट करत आणि स्वत:ला होत असलेल्या कोणत्याही त्रासाची तक्रार न करता नेहमीच चेहऱ्यावर एक स्मितहास्य ठेवत असतो तो म्हणजे बाबा.
आपल्या आयुष्यातला एक असा माणूस, जो कधीही "मी थकलोय" असे म्हणत नाही. तो सतत आपल्यासाठी झटतो. कधी हसून, कधी शांत राहून, तर कधी कठोर होऊन आपल्याला योग्य दिशा दाखवतो. आपल्या सुख-दुखा:त पूर्णपणे सामील होतो. पण तरीही तो कधी आपली भावना व्यक्त करत नाही.
फादर्स डे हा त्याच्या न बोलणाऱ्या प्रेमाला एक छोटासा सलाम आहे.
फादर्स डेची सुरुवात अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया राज्यातल्या फेअरमाँट या शहरात १९०८ साली एका मोठ्या खाण दुर्घटनेनंतर झाली. या अपघातात ३६२ पुरुषांचा मृत्यू झाला आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून तिथे पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला.
त्यानंतर सोनोरा स्मार्ट डॉड नावाच्या एका महिलेला फादर्स डे सुरू करण्याची कल्पना सुचली. तिच्या आईचे निधन झाल्यावर, तिच्या वडिलांनी एकटेच सहा मुलांचे पालनपोषण केले होते. त्यामुळे तिला वाटले की जसे मदर्स डे साजरा करतो, तसंच वडिलांच्या प्रेमासाठी, त्यागासाठी आणि कष्टासाठी एक खास दिवस असायला हवा.
१९०९ साली तिने ही कल्पना मांडली आणि स्थानिक चर्च, दुकानदार, YMCA संस्था आणि काही सरकारी लोकांनी तिला पाठिंबा दिला. परिणामी, १९ जून १९१० रोजी पहिला अधिकृत फादर्स डे साजरा करण्यात आला. हळूहळू ही सवय अमेरिकेत आणि नंतर संपूर्ण जगभर पसरली व जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.
फादर्स डे हा दिवस आपल्यास वडिलांनी केलेल्या प्रेमाचे, कष्टाचे आणि मार्गदर्शनाचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. वडिलांच्या आपल्या आयुष्यातील शांततेत निभावलेल्या वाट्याला, भूमिकेला मान देण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सगळे मिळून हा दिवस साजरा करतात.
जगातल्या बऱ्याच देशांमध्ये फादर्स डे हा जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. 2025 मध्ये भारतात हा दिवस 15 जून रोजी येणार आहे.
पण काही देशांमध्ये फादर्स डे वेगळ्या दिवशी साजरा केला जातो. जसे की, इटली, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये हा दिवस 19 मार्चला साजरा होतो. थायलंडमध्ये 5 डिसेंबर, म्हणजेच तिथल्या दिवंगत राजांचा वाढदिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. तर तैवानमध्ये 8 ऑगस्ट रोजी हा दिवस मानला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.