चूक असूनही पुरूष Sorry का बोलत नाही? 'ही' ५ कारणे असू शकतात

Sorry
Sorry

Relationship Tips in Marathi: कपल्समध्ये (Couples) नेहमी भांडण- वाद होत असतात. भांडणानंतर एक पार्टनर (Partner)सॉरी बोलून विषय सोडून देतो पण दुसरा मात्र सॉरी (Sorry) बोलायला संकोच करतो. सर्वसाधारणपणे महिला परिस्थिती पटकन समजून घेतात पण पुरूष मात्र स्वत: पुढाकार घेऊन माफी मागण्यासाठी संकोच करतात. कित्येकदा या सवयीमुळे चांगलं नातं (Relationship) देखील खराब होते. चला जाणून घ्या, तुमच्या पार्टनरला तुमची का नाही मागू शकत.

Sorry
Weight Loss Foods: वेगाने वजन कमी करतील हे 5 घरगुती उपचार

स्वत:ला चूकीचे मानत नाही

पुरुष नेहमी हेच मानतात की त्यांनी काही चूक केली नाही मग ते माफी कोणत्या गोष्टीसाठी मागायची. जर त्यांची काही चूक केली असेल तरीही ते समजतात की जर त्यांनी माफी मागितली तर पार्टनरपेक्षा छोटे होतील. त्यांना पुन्हा विनाकारण माफी मागावी लागेल. अशावेळी त्यांनी तुम्हाला त्यांना सुरक्षित वाटू दिले पाहीजे आणि पुरुषांनीही आपली चूक मान्य केली पाहिजे.

Sorry
ओमिक्रॉनच्या रुग्णांना बरे झाल्यानंतरही होऊ शकतो पाठदुखीचा त्रास

असुरक्षिततेची भीती

काही पुरुष जोडीदारांच्या मनात असुरक्षिततेची भितीमुळे माफी मागत नाहीय त्यांना वाटते, माफी मागण्यामुळे कोणती नकारात्मक परिस्थिती येऊ नये असे त्यांना वाटते. याची भावानांच्या गुंतागुतीमध्ये ते अडकलेले असतात आणि माफी मागावी की नाही हे ठरवू शकत नाही. ते विचार करतात की, माफी मागण्यासाठी कदाचित परिस्थिती त्यांच्या बाजूने राहणार नाही या भितीने ते ठरवू शकत नाही की कधी आणि कशी पार्टनरला सॉरी बोलावे. अशा वेळा स्वत:हून पुढाकार घेऊन त्यांना प्रेमाने त्यांची चूक समजविण्याची गरज आहे.

सॉरी न बोलता माफी मागणे

काही पुरुषांना सॉरी बोलण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने माफी मागतात. जसे की पार्टनरच्या आवडीचे काही गिफ्ट देऊन त्यांना खूश करतात. कधी कधी ते पार्टनरचा जास्त काळजी घेऊन आपल्या भावना व्यक्त करतात. विशेष म्हणजे, महिलांना बिना बोलता माफी मागण्याची पध्दत खूप आवडते. त्या काही न बोलता त्यांच्या भावना समजून घेतात.

अंहकारी स्वभाव

तुमच्या पार्टनरचा स्वभाव असाही असू शकतो की त्यांनी कधीही आपल्या चूकीची माफी मागण्याची सवय नसते. त्यांना फक्त या गोष्टीचा अंहकार असतो की ते कधीही चूकत नाही. असे स्वभाव असलेले लोकांचे नाते दिर्घकाळ टिकत नाही. पार्टनरसोबत लवकर नाते खराब होऊ लागते. आपल्या पार्टनरच्या बेजबाबदारपणे वागतात. आपल्या पार्टनरच्या जबाबदाऱ्यांचा परिणाम तुमच्या नात्यावर पडू नये यासाठी त्यांना समजवा.

भावना व्यक्त करू न शकणे

बहूतेक पुरुषांना ही सवय असते की ते आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. ते आपल्या भावना मोकळेपणाने कोणासोबत शेअर करू शकत नाही. मग ते त्यांचा जोडीदार असला तरी. अशा वेळी त्यांना माहित असते की ते चूकले आहे पण तरी ते सॉरी बोलू शकत नाही. त्यासाठी कदाचित ते तेव्हा माफी मागतील जेव्हा ती गोष्ट जुनी झालेली असते आणि तुम्ही सर्व गोष्टींची तडजोड केलेली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com