
Women's Day 2025: दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संपुर्ण जग महिला दिन साजरा करतो. हा दिवस महिलांसाठी खुप खास मानला जातो. त्यांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देते. त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतो. या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरातील महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकियदृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर दिला जातो. पण महिला दिन केवळ ८ मार्चलाच का साजरा केला जातो हे जाणून घेऊया.