
Tremble On Music : संगीत कानावर पडताच आपोआप कसे थिरकतात पाय? हे आहे कारण
Trembling On Music : आपल्या सर्वांना संगीत ऐकायला आवडते. संगीत नसेल तर सर्व काही निस्तेज वाटते. मोठ्या आवाजातील संगीत ऐकून आपले मनही नाचण्याकडे झुकते. पण तुम्हाला माहिती आहे का? की संगीत कानावर पडताच आपल्यापैकी अनेकांचे पाय शिरकायला लागतात. संगीत ऐकताच काही लोक नाचू लागतात तर काही टाळ्या वाजवू लागतात. मात्र, असे का घडते? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? शास्त्रज्ञांनी यावर एका संशोधनात उत्तर शोधले आहे. (Why Legs Start Dancing On Music )
हेही वाचा: Happy Life : तुम्हालाही तणाणमुक्त जगायचं? फॉलो करा 91 टक्के लोकांचा फॉर्मुला
नेचर जर्नल ह्युमन बिहेवियरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात म्हटले आहे की वेगवेगळ्या लोकांवर संगीताचा प्रभावही वेगवेगळा असतो. अमेरिकेच्या वँडरबिल्ट जेनेटिक्स इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय संशोधकांसह यावर संशोधन केले. त्यानंतर नेचर ह्युमन बिहेवियर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात यामागे आपले जीन्स असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा: Viral Video : दिवाळीतील स्वच्छतेचे भूत! पुसण्याऐवजी पाण्याने धुतल्या 'या' वस्तू
संगीतावर माणूस का? थिरकायला लागतो याचे कारण शोधण्यासाठी संशोधकांनी 6 लाख लोकांवर संशोधन केले. यामध्ये मानवी शरीरात एकही रिदम जीन नसतो, जो माणसाला नृत्य करण्यास भाग पाडतो. शरीरातील अनेक जीन्सचा संबंध थेट आपल्या मेंदूशी असतो. संगीत कानावर पडताच तणाव कमी होतो आणि शांतता अनुभवता येते हे यापूर्वीच्या एका संशोधनातून समोर आले आहे. नवीन संशोधनानुसार काही विशिष्ट जनुक असलेले लोक संगीताकडे आकर्षित होतात आणि संगीत कानावर पडताच त्यावर नृत्य करण्यास सुरवात करतात.