Why Throwback 2016is Trending on Social Media
sakal
लाइफस्टाइल
Throwback 2016: सोशल मीडियावर व्हायरल होतोय जुन्या आठवणींचा नवा ट्रेंड! नक्की काय आहे 'थ्रोबॅक २०१६'
Throwback 2016 Trend Goes Viral on Social Media: सोशल मीडियावर जुन्या आठवणी ताज्या करणारा ‘थ्रोबॅक २०१६’ हा नवा ट्रेंड सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पण हे एवढं ट्रेंड का होत आहे ते जाणून घ्या.
Social Media’s New Nostalgia Trend: नवीन वर्ष सुरु होऊन एक महिनाही झाला नाही आणि काही दिवसांनी सोशल मीडियावर अचानक एक ट्रेंड व्हायरल होताना दिसत आहे. सेलिब्रिटीज सोशल मीडियावर आपले २०१६ चे फोटो आणि आठवणी पोस्ट करत आहेत, जो आता ट्रेंड बनत आहे. सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर आणि लोक मागील दहा वर्षांपूर्वीचे फोटो शेअर करायला लागले. काही लोकांसाठी २०१६ हे काळं त्यांच्या आयुष्यातील मोकळे दिवस होते, तर काहींसाठी ते मोठ्या घटनांचं वर्ष – लग्न, सगाई किंवा बाळाचा जन्म – होते.

