esakal | चुकूनही पतीला सांगू नका 'या' पाच गोष्टी; संसाराला लागू शकतो तडा
sakal

बोलून बातमी शोधा

चुकूनही पतीला सांगू नका 'या' पाच गोष्टी

चुकूनही पतीला सांगू नका 'या' पाच गोष्टी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सुखी संसाराची गुरुकिल्ली म्हणजे समजूतदार नवरा आणि प्रेमळ बायको. या दोन गोष्टी जुळून आल्या की संसार छान फुलून येतो. मात्र, सध्याच्या काळात सुखी संसाराची संकल्पना कुठेतरी लोप पावत चालली आहे. आज लग्नापेक्षा घटस्फोटाच्याच बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. जरा पटलं नाही की लगेच ही तरुणाई काडीमोड घेते. परंतु, संसार करणं काही सोपं नाही. म्हणायला गेलं तर तसं कठीणदेखील नाही. फक्त काही अशा गोष्टी असतात ज्यांचा आपण नीट विचार केला पाहिजे. यामध्येच विश्वास हा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. जर संसारात एकमेकांवर विश्वास नसेल तर तो संसार टिकणं अवघड आहे. त्यातच हे नातं दीर्घकाळापर्यंत टिकवायचं असेल तर, अशा काही गोष्टी असतात ज्या जोडीदाराला न सांगणंच फायद्याचं असतं. म्हणूनच, स्त्रियांनी साधारणपणे नवऱ्यापासून कोणत्या गोष्टी लपवाव्यात किंवा त्याला त्या कधीच सांगू नयेत, याविषयी जाणून घेऊयात. (wife-need-to-hide-this-things-from-husband-for-happy-relation)

१. बचत -

भविष्याचा विचार करुन आर्थिक बचत करणं काळाची गरज आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया थोडेथोडे पैसे जा करत असतात. परंतु, अनेक स्त्रियांनी प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगायची सवय असते. मात्र, पैशांच्या बचतीची गोष्ट कधीच सांगू नका. कारण, अनेकदा तुम्ही सेव्हिंग केलेले पैसे उगाच निर्थक कामासाठी खर्च होऊ शकतात. उलटपक्षी तुम्ही गपचूप सेव्हिंग केली तर अडअडचणीच्या वेळी याच पैशामुळे तुम्ही कुटुंबियांची किंवा पतीची मदतही करु शकता.

हेही वाचा: काकडी खाल्ल्यावर चुकूनही पिऊ नका पाणी!

२. कुटुंबाचे दोष -

अनेक स्त्रियांना घरात लहान मोठे वाद झाले की लगेच पतीला सांगण्याची सवय असते. मात्र, ही चूक कधीच करु नका. त्यामुळे तुमचा पती तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही सतत सासऱ्याच्या मंडळींची चुगली करता, त्यांचा द्वेष करता असा समज नवऱ्याचा होऊ शकतो. परिणामी, तुमच्याच नात्यात वितुष्ट येऊ शकतं.

३. जुनं प्रेम प्रकरण -

सध्याच्या काळात खरं पाहायला गेलं तर सगळेच ओपन माईंडेड आहेत. त्यामुळे अनेक मुली लग्न झाल्यावर किंवा लग्न ठरल्यावर लगेच जुन्या अफेअर्सबद्दल सांगतात. नवऱ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नये त्यामुळे त्याला सत्य परिस्थिती सांगणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. परंतु, जोपर्यंत पती आणि तुमच्यात कन्फर्ट झोन तयार होत नाही. नवऱ्याचा स्वभाव तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्याला काही सांगू नका. नाही तर, अनेकदा भांडणं झाल्यावर त्यात तुमच्या चारित्र्यावरुन तुम्हाला बोल लागू शकतात.

हेही वाचा: JCB चा रंग पिवळाच का असतो माहित आहे?

४. अविश्वास -

नवऱ्यावर कधीही कारण नसतांना अविश्वास दाखवू नका. त्यामुळे कलह होऊ शकतो. त्याच्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही वारंवार अविश्वास दाखवत असाल तर पती तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवू शकतो.

५. दुषणं लावणं-

चारचौघात किंवा मित्रपरिवारामध्ये गेल्यावर नवऱ्याला कमीपणा वाटेल असं वागू नका. त्याचे दोष इतरांना सांगू नका. त्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावू शकतो.