हिवाळ्यात ट्रिप प्लॅन करताय?; अशी घ्या काळजी! : Winter Travelling | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Travelling Plan

Winter Travelling : हिवाळ्यात ट्रिप प्लॅन करताय?; अशी घ्या काळजी!

Winter Travelling Tips : हिवाळा हा ऋतू तसा सर्वांनाच आवडतो. ना पावसाची चिकचिक असते ना कडक उन्हाचा तडाखा. हिवाळ्यात सर्व वातावरण रोमॅन्टीक असते. त्यामूळे नव्याने लग्न झालेले आणि जूनेच नाते नव्याने अनूभवायला लोक फिरायला जाण्याचे प्लॅन करतात. कारण, दिवाळीनंतर थंडी पडते. त्यामूळे दिवाळी आणि डिसेंबरमध्ये नाताळ अशा सुट्ट्या येतात. त्यामूळे लोक हमखास फिरायला जाण्याचे नियोजन करतात.

थंडीत आजारी पडणाऱ्या लोकांना फिरायला जाणे जिवावर येते. कारण, ते बाहेर पडले की सर्दी आणि त्वचेची ऍलर्जी होते. त्यामूळे त्या लोकांसाठी प्रवास सुखकर होत नाही. सगळे लोक मस्त मजा करतात आणि आजारी लोक हॉटेलमध्येच झोपून राहतात. अशावेळी काय काळजी घ्यायची ते पाहुयात.

हेही वाचा: Parenting Tips : पालकांच्या 'या' ६ सवयींनी संपते मुलांचे 'फ्यूचर'

सोबत मेडीकल किट ठेवा

प्रवास करताना तूम्हाला कधी कोणत्या गोष्टीची गजर लागेल हे सांगता येत नाही. त्यामूळे तूमच्या बॅगेत नेहमी मेडीकल कीट ठेवा. ज्यामूळे सहप्रवाशानाही त्याची मदत होईल. प्रवासात किंवा ट्रीपवर गेल्यावर ट्रेकींग, रनिंग करावे लागते. अशावेळी तूम्हाला एखादी दुखापत होऊ शकते. त्यावेळी हे कीट उपयोगी पडते. त्यासोबत कफ सिरप, अँटीबायोटिक्स आणि फ्लूचे औषध नक्कीच ठेवा.

सॅनिटरी नॅपकीन

महिलांना प्रवासात मासिक पाळीचा सामना करावा लागू शकतो. काही वेळी पाळी येऊन गेलेली असते. पण तरीही प्रवासामूळे पाळी येऊ शकते. अशावेळी महिलांनी सोबतसॅनिटरी नॅपकिन ठेवावे.तसेच, पोटदूखीच्या गोळ्याही ठेवाव्यात. ज्यामुळे प्रवास सुखकर होईल.

थंडीची कपडे सोबत असूद्या

इतरवेळी प्रवासात सुटसूटीत वाटावे म्हणून फिरताना शॉर्ट कपडे घातले जातात. पण, हिवाळ्यात थंड हवा त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे फिरायला गेल्यावर सोबत स्कार्फ, कानटोपी, स्वेटर घेऊन जा. कान झाकल्याने तुमचे सर्दीपासून संरक्षण होईल.

बूट आणि सॉक्स

हिवाळ्यात सहलीला जाण्याआधी चांगल्या क्वालिटीचे बूट विकत घ्या. कारण, थंडीत पाय फुटल्याने त्रास होतो. तसेच, सहलीच्या ठिकाणी चालणेही जास्त होते. त्यामूळे चांगले बूट असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही डोंगराळ आणि बर्फाळ भागात निसरडे झाल्यास अपघात होऊ शकतो.

एकच बॅग घ्या

सहलीला जाताना चार पाच बॅग घेण्याऐवजी एकच मोठी बॅग घेणे फायदेशीर ठरते. त्या एका बॅगसोबत एक सॅक किंवा हॅन्डबॅग घ्यावी. ज्यामूळे पाणी, खाण्याचे पदार्थ त्यामध्ये ठेवता येतील.