
Mother’s Day 2025 Marathi Wishes: मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदा ११ मे रोजी जागतिक मातृदिनस साजरा केला जाणार आहे. माृतदिन हा प्रत्येक आईला समर्पित आहे. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वरांचा संगम होय. हा दिवस आईला आदर देण्यासाठी आणि तिच्या योगदानाचे महत्त्व ओळखण्यासाठी एक खास दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस खास बनवण्यासाठी अनेक लोक विविध प्लॅनिंग करत असतात. तुम्हाला यंदा मातृदिन खास बनवायचा असेल तर मराठी अंदाजात खास शुभेच्छा देऊ शकता.