
डॉ. मणिभाई देसाई यांनी उभारलेल्या बाईफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन उरुळी कांचन येथील सेवाभावी संस्थेने ग्रामीण विकासांतर्गत महिला सबलीकरणाचे कार्य १९९५ मध्ये सुरू केले. हवेली व दौंड तालुक्यामधील सुमारे वीस गावांमध्ये दीडशे महिला स्वयंसहायता बचत गटांची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला खामगाव, बोरी ऐंदी, कोरेगाव, उरुळी कांचन, कासुर्डी, भरतगाव येथे बचत गट निर्माण झाले.