Women Fashion Tips: इअरिंग्सचा असाही करता येतो वापर! हे हॅक नक्की ट्राय करून बघा

स्त्रीचा श्रृंगार दागिन्यांशिवाय अपूर्ण आहे.
Women
Women sakal

जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की स्त्रीचा श्रृंगार दागिन्यांशिवाय अपूर्ण आहे. कानातले सगळ्या दागिन्यांमध्ये आणखी योगदान देतात. कानातले वापरल्याने महिलांचे सौंदर्य आणखीनच सुंदर दिसते. आजकाल इअरिंग्सच्या अनेक डिझाईन्स आहेत. जे महिलांना सर्व प्रकारच्या कपड्यांसोबत मॅचिंग करुन घालायला आवडते.

लाइटवेट इअरिंग्स कॅज्युअल आउटफिटसह चांगले दिसतात, फॉर्मल्ससाठी स्टड्सची स्वतःची एक क्रेझ असते. दुसरीकडे, वेडिंग पार्टी आली की, मोठे झुमके छान दिसतात. या इअरिंग्सशी संबंधित काही हॅक तुम्हाला माहित असतीलच. जेणेकरून ते घालणे सोपे जाईल. चला तर मग जाणून घेऊया इअरिंग्सशी संबंधित कोणकोणत्या हॅक्स आहेत.

Women
Relationship tips: रिलेशनशिपमध्ये असूनही एकटेपणा वाटतोय? मग या टीप्स करा फॉलो

लग्नाच्या फंक्शनमध्ये हेवी इअरिंग्स घालायची इच्छा आहे. पण हे इअरिंग्स कानात राहतच नाहीत. मग ही ट्रिक नक्कीच कामी येईल. ईयर रिंग्स सुरक्षित वापरण्यासाठी कागदी टेप वापरा. या टेप्सचा एक छोटा तुकडा कानाच्या छिद्राच्या मागील बाजूस ठेवा आणि ईयर रिंग्स घाला. हे तुमच्या कानात सहज बसतील.

कधी कधी चांगले आणि महागडे इअरिंग्स हरवतात. इअरिंग्स नेहमी पेयरमध्ये चांगले दिसतात. अशा परिस्थितीत, आपले आवडते ईयर रिंग्स जर हरवले गेले तर आपल्याला दुःख होते. जर तुमच्या इअरिंग्सची दुसरी जोडी हरवली असेल तर ती फेकून देण्याऐवजी कुर्ता किंवा शर्टमध्ये ब्रोच म्हणून वापरा. ते खूप सुंदर दिसेल.

Women
Vastu Tips for Students: लहान मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होत नाहीये? मग वास्तूशास्त्राचे हे उपाय ठरतील फायदेशीर

जर तुम्ही ट्रेडिशनल लूकमध्ये तयार होत असाल आणि मांगटिका (बिंदी) लावायची असेल तर काळजी करू नका. तुमचे आवडते कानातले बिंदी बनवूनही घालता येतात. इअरिंग्सचा असा वापर पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. त्यामुळे पुढच्या वेळी कोणतेही इअरिंग्स साधे समजू नका. कानात घालण्याशिवाय ते मांगटिका, ब्रोच म्हणूनही वापरता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com