Breast Cancer
Breast CancerSakal

Breast Cancer: 'या' 5 गोष्टी केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका होऊ शकतो कमी

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी पुढील गोष्टीची मदत घेऊ शकता.

Breast Cancer: स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोगांपैकी एक आहे. अभ्यासनुसार दरवर्षी जगभरात लाखो नवीन प्रकरणांचे निदान केले जाते. पोषक पदार्थांचा अभाव, अनुवांशिक घटक, वय, लठ्ठपणा आणि जीवनशैली या सर्व घटकांमुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.

वजन नियंत्रणात ठेवणे

स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. जास्त वजन, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर, स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार , लठ्ठपणामुळे पोस्टमेनोपॉझल महिलांना निरोगी महिलांपेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका 30-60% जास्त असतो. 

नियमित व्यायाम करा

अभ्यासानुसार असे दिसून आले की नियमितपणे व्यायम केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. ब्रिटीश जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या महिला शारीरिकरित्या सक्रिय होत्या त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका 20% कमी असतो. तसेच निरोगीआरोग्यासाठी योगा करणे चांगला असतो.

नियमितपणे तपासणी करावी

मेमोग्राम, क्लिनिकल स्तन तपासणी आणि स्व-तपासणी यासह नियमित तपासणी करावी. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, नियमित मेमोग्राम स्तनाचा कर्करोग सर्वात उपचार करण्यायोग्य असताना सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्यात मदत करू शकतात. त्यामुळे वेळेवर तरासणी करावी. आरशासमोर उभे राहून दोन्ही स्तनांची तपासणी करून महिला स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखू शकतात. 

Breast Cancer
Healthy Tips: माठातील पाणी आरोग्यदायी, खाली बसून घोट घोट पाणी पिणे सर्वोत्तम

स्तनपान

असे दिसून आले आहे की स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. ॲनाल्स ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित मेटा-विश्लेषणात असे आढळून आले की 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ स्तनपान केल्याने स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कधीही स्तनपान न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत 26% कमी झाला. 

सकस आणि पौष्टिक आहार

सकस आणि पौष्टिक आहारामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळता येतो. यासाठी फळे, भाज्या,  कडधान्य आणि प्रथिने यांचा आहारात समावेश करावा. प्रक्रिया केलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. हे लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com