Women Health : मैत्रिणींनो ब्रेस्टमध्ये सतत खाज सुटते? या सवयी बदलून पहा, नक्की फरक पडेल

कधी घाईत तर कधी नकळत या चूका महिलांकडून घडतातच
Women Health tips
Women Health tipsesakal

Women Health :

महिलांच्या शरीरातील संवेदनशील अवयव म्हणून स्तनांकडे पाहिले जाते. मातृत्वाला पूर्णत: देणारा अवयव म्हणून स्तनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण अलिकडच्या काळात स्तनांच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. स्तनांचे कर्करोग, स्तनांमध्ये गाठी होणे या प्रकारच्या समस्या अधिक उद्भवत आहेत.

शरीराच्या इतर भागांप्रमाणेच अनेक वेळा स्तनांशी संबंधित तक्रारी येतात. अशीच एक समस्या म्हणजे स्तनाच्या भागात खाज येण्याची समस्या. आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात खाज येते, त्याचप्रमाणे स्तनाच्या भागातही खाज येऊ शकते.

स्वच्छता आणि जीवनशैलीशी संबंधित निष्काळजीपणा हे देखील यामागे कारण असू शकते. तुम्हालाही स्तनाच्या भागात खाज येण्याची समस्या असेल तर त्यामागे अनेक वाईट सवयी असू शकतात. या सवयींबद्दल आपण नंतर सविस्तर बोलू. या विषयावर डॉ. सीमा यादव यांनी अधिक माहिती दिली.

Women Health tips
Breast Cancer : वेळेत निदान झाल्यास मृत्यूचा धोका टळतो, तेव्हा महिलांनी वेळेत घ्या ही काळजी

ब्रा योग्य प्रकारे स्वच्छ न करणे

जर तुम्ही ब्रा नीट स्वच्छ केली नाही तर स्तनाच्या भागात खाज येण्याची समस्या होऊ शकते. ब्रा साफ करणे खूप महत्वाचे आहे. ब्रा स्वच्छ करण्यासाठी सौम्य डिटर्जंटचा वापर करावा. याशिवाय गरज भासल्यास दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा ब्रा बदला. प्रवासामुळे वैगरे घामाने ब्रा भिजतात. त्या घरी आल्यानंतर बदलाव्यात. तशाच राहील्याने घाम मुरतो अन् स्तनांच्या त्वचेला इन्फेक्शन, रिऍक्शन येऊ शकतं. (Women Health Tips)

Women Health tips
Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर उपचारानंतर फक्त याच महिला करू शकतात ब्रेस्टफीडिंग, कारण..

बॉडी मॉइश्चरायझर न वापरणे

कोरड्या त्वचेमुळे देखील खाज येण्याची समस्या उद्भवते. हे देखील स्तनात खाज येण्याचे एक प्रमुख कारण असू शकते. स्तनात खाज येत असल्यास, तुम्ही सौम्य मॉइश्चरायझर वापरू शकता. थंडीच्या दिवसात खोबरेल तेल वापरता येते. खोबरेल तेल हलके गरम करून स्तनाच्या भागावर मसाज केल्याने खाज येण्याची समस्या लवकर दूर होते.

हिवाळ्यात अंघोळ न करणे

हिवाळ्यात आंघोळ न केल्यामुळे स्तनाच्या भागात खाज येऊ शकते. हिवाळ्यात लोकांना आंघोळ करणे फारसे आवडत नाही, त्यामुळे त्वचेत बॅक्टेरिया जमा होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठतात. यामुळे स्तनाच्या भागात खाज सुटते. जर तुम्हाला हिवाळ्यात आंघोळ करावीशी वाटत नसेल तर तुम्ही स्पंज बाथ देखील घेऊ शकता.

Women Health tips
Breast Cancer : स्तनाचा कर्करोग आणि उपाय

भरपूर औषधे खाणे

जास्त औषधे घेतल्याने खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. काही लोक किरकोळ त्रासासाठीही औषधे घेतात. या सवयीमुळे स्तनाच्या भागात खाज येण्याची समस्या होऊ शकते. तुम्हीही खूप औषधे घेत असाल तर ही सवय सोडा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

भरपूर परफ्यूम वापरणे

परफ्यूमच्या जास्त वापरामुळे स्तनाच्या भागात खाज येऊ शकते. बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये परफ्यूम देखील असतो.आजकाल प्रत्येकीकडे परफ्युम असतोच.

ज्याच्या जास्त वापरामुळे स्तनाच्या भागात खाज सुटते. ही समस्या टाळण्यासाठी परफ्यूमचा वापर जपून करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com