

Monsoon UTI Risk in Women
sakal
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता, ओले कपडे घालणे, पाण्याचे कमी सेवन आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन (यूटीआय) धोका वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
या काळात जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढत असून, वेळेत उपचार न घेतल्यास समस्या गंभीर होऊ शकते. यूटीआय हा मूत्रमार्गात होणारा जिवाणूजन्य संसर्ग आहे. पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे जंतूंची वाढ जलद होते. त्यामुळे संसर्गाची शक्यता वाढते.