Women's Equality Day: महिलांना द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

महिलांच्या हक्कांसाठी दरवर्षी आजचा दिवस हा 'महिला समानता दिन' म्हणून साजरा केला जातो.
Women's Equality Day
Women's Equality Dayसकाळ
Updated on

Women's Equality Day: आज जगभरात 'महिला समानता दिन' साजरा केला जातो. महिलांना समान मानवी हक्क मिळावा, त्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने महिला समानता दिन दरवर्षी २६ ऑगस्टला साजरा केला जातो. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांसमोर आहे. त्यासाठी महिलांना समान अधिकार मिळणे तितकेच आवश्यक आहे. त्यांच्या हक्कांसाठी दरवर्षी आजचा दिवस हा 'महिला समानता दिन' म्हणून साजरा केला जातो.

तुमच्या आयुष्यातील महिला विशेषत: आई, बहिण, मुलगी, मैत्रीण, प्रेयसी किंवा बायको यांना 'महिला समानता दिनाच्या’ शुभेच्छा देत असाल तर खालील हटके शुभेच्छा पहा आणि त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवा. (Womens Equality Day 2022 Messages wishes quotes check list)

Women's Equality Day
International Dog Day: 'तू तर उर्फीसारखाच अतरंगी!' कुत्र्याचं अजब 'ड्रेसिंग'

1. नारी हीच शक्ती आहे नराची,

नारी हीच शोभा आहे घराची,

तिला द्या आदर, प्रेम, माया,

घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा.

महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. ती आहे म्हणून हे विश्व आहे.

ती आहे म्हणून घराला घरपण आहे.

ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.

तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3. तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,

तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा.

महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Women's Equality Day
World Vada Pav Day : खाता का नेता? चटपटीत वडापावची स्टोरी वाचा

4. ती आई आहे, ती ताई आहे,

ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,

ती पत्नी आहे, ती सून आहे,

ती सासू आहे, ती आजी आहे.

पण याआधी ती एक स्त्री आहे.

जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

5. स्मरण त्यागाचे,

स्मरण शौर्याचे,

स्मरण कर्तृत्त्वाचे,

स्मरण स्त्री पर्वाचे.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

6. सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत,
प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा
ठसा उमटविणाऱ्या नारी शक्तीस सलाम!
महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Women's Equality Day
Senior Citizen Day: म्हातारपणात आजारमुक्त राहाण्यासाठी लावा खाण्याच्या या पाच सवयी

7. तुझ्या उत्तुंग भरारीपुढे,
गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व सारे वसावे

महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

8. जी नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार,
मग तिलाच का केवळ त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने,
करा तिचा सन्मान.

महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com