esakal | World Arthritis Day : सारखा सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile Network

World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जे आजार वयाच्या साठीनंतर होतात ते आता प्रामुख्यान तिशी- पस्तीशीतील तरूणाईमध्ये दिसायला लागले आहेत. त्यात गेल्या पाच ते सात वर्षांपासून संधिवात हा आजार तरूणांमध्ये दिसायला लागला आहे. पाठ दुखणे, हाडे दुखणे, आमवात अशा विविध कारणांनी तरूण मुल मुली सध्या त्रस्त आहेत. पण जर तुम्ही हाय हिल्स वापरत असाल, मोबाईल जास्त पाहात असाल तर संधिवाताला आमंत्रणच मिळत आहे. थंडीच्या काळात अनेक लोकांना संधिवात जाणवतो.

यांना अधिक शक्यता

जे लोक लठ्ठ असतात त्यांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते.

हाय हिल्स घातल्याने संधिवाताला आमंत्रण मिळते. हाय हिल्स मुळे पायाची ठेवण थोडीशी बदलून सांधे आणि स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे पाठदुखी तसेच पाय दुखू शकतात. त्यामुळे हाय हील्स घालणाऱया महिलांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

तुमच्या शरीरावर झालेल्या काही जुन्या जखमा ही संधिवाताला कारणीभूत असू शकतात. गुडघ्याला दुखापत झालेल्यांना आथ्रायटिस होण्याची शक्यता अधिक असते.

the users of social media the new feature of chatting clear recent from list

the users of social media the new feature of chatting clear recent from list

चॅटींग ठरू शकते घातक

सारखे सारखे चॅटींग करणेही आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. मोबाईलवर चॅट करत असताना तुमच्या अंगठ्यावर ताण येऊन अंगठा दुखू शकतो. तसेच तुमची मान आणि खांद्यावरही ताण येऊ शकतो. जर तुम्हाला दुखण्यापासून दुर राहयाचे असेल तर अंगठ्याने मॅसेज टाईप करण्याचे कमी करा. त्यापेक्षा व्हॉईस कॉल अथवा व्हिडिओ कॉल करा.

exercise

exercise

जीवनशैलीत बदल करा

जास्त साखर, मैद्याचे पदार्थ तसेच प्रोसेस़्ड फूड खाल्याने वजन वाढते. त्यामुळे संधिवात वाढण्याची शक्यता असते. म्हणून आहारात फळे, कडधान्ये, नट्स यांचा समावेश करावा.

हाय हिल्सचा वापर कमी करावा.

नियमित व्यायाम आणि योगासाने करून आपले शरीर नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी.

उठता- बसताना जेवताना, झोपताना तुमच्या शरीराची रचना (पोश्चर) योग्य राहील, याकडे लक्ष द्या.

नियमित व्यायाम, मॉलिश, योग्य आरोग्य प्रणालींचा उपयोग करून संधिवातापासून दूर रहा.

loading image
go to top