World Bicycle Day 2024: सायकल चालवण्याचा आनंद घ्यायचा असेल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी

World Bicycle Day 2024: जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घेऊया सायकल चालवताना कोणते नियम आणि गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
World Bicycle Day 2024:
World Bicycle Day 2024: Sakal

World Bicycle Day 2024: दरवर्षी ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने 3 जून 2018 रोजी जागतिक सायकल दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. हा सण साजरा करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांना सायकलचे महत्त्व पटवून देणे हा आहे. सायकल चालवल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आज जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घेऊया सायकल चालवताना कोणते नियम आणि गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

सायकल चालवताना मोबाईल, हेडफोनचा वापर करू नका.

सायकल चालवताना डोळे आणि कान संतर्क ठेवावे.

जर तुम्हाला झोप येत असेल किंवा मद्यपान केले असेल तर सायकल चालवू नका. कारण यामुळे होणारा अपघात टळेल.

सायकल चालवताना नेहमी हेल्मेट घालावे. यामुळे पडल्यास डोक्याला दुखापत होणार नाही.

तुम्ही जर ग्रुप सायकलिंग करत असाल तर एकमेकांच्या बरोबरीने न जाता एका मागे एक सायकल चालवा.

रस्त्यावर सायकल चालवत असाल तर वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. वळण घेण्यापूर्वी दोन्ही बाजू पहावे. डावीकडे किंवा उजवीकडे वळताना नेहमी ट्रॅफिकडे लक्ष ध्यावे.

रात्रीच्या वेळी साकयकल चालवत असाल तर रेडिएटर किंवा रिफ्लेक्टिव्ह कपडे घालावे.

सायकलस्वारांनी वळण घेताना किंवा थांवताना सूचित करण्यासाठी सिग्नल द्यावे.

पार्क केलेल्या कारच्या दरवाजाच्या थोड्या अंतरावर सायकल पार्क करावी. कारण अनेक सायकलस्वार त्यांच्या सायकलीवरून खाली पडले आहेत.

गरज पडेल तेव्हा सायकलच्या घंटीचा वापर करावा.

सायकलने प्रवास करताना सायकलची सीट, ब्रेक,वायरिंग यांची तपासणी करावी.

रस्त्यावर असलेले खड्डे, खडबडीत रस्ते, तुटलेल्या काचा हे सर्व धोकादायक आणि अपघातास कारणीभूत ठरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com