

World Environment Day 2026
sakal
World Environment Day 2026 History, Importance and Theme: जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी संपूर्ण जगात साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला पृथ्वीचं रक्षण करणं ही प्रत्येक व्यक्तीची सामूहिक जबाबदारी हे आठवण करून देतो. हवामानातील बदल, प्रचंड प्रमाणात होणारी झाडतोड, नदीकाठ विकास प्रकल्प (Riverfront Development Projects), वाढतं प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची होणारी नासधूस यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे जनजागृती, विविध मोहिमा आणि उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. हा दिवस संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्याद्वारे साजरा केला जातो. UNEP (United Nations Environment Programme) ही आंतरराष्ट्रीय संस्था जगभर पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहे.