esakal | हृदययाला निरोगी ठेवण्यासाठी आहारात समावेश करा 'या' पाच पदार्थाचा ; World Heart Day 2021
sakal

बोलून बातमी शोधा

World Heart Day 2021

हृदयाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी आहारात करा या पदार्थाचा समावेश.

हृदययाला निरोगी ठेवण्यासाठी आहारात समावेश करा 'या' पाच पदार्थाचा

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

लहान वयात येणारा लठ्ठपणा, मधुमेह, तरूण वयात अती कामाचा ताण,खाण्यातील बदल, सतत आॅनलाईन व जागरण यामुळे खूप कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्य़ाचे प्रमाण वाढले आहे. ४० ते ५० वयोगटातील झटका येण्याचे प्रमाण २५ टक्के वाढले आहे. भारतात जन्मत:च रक्त वाहिनीचा आकार कमी असणाऱ्यांचे प्रमाण २.५ ते २.७ मिलीमीटर एवढे आहे. तर परदेशातील व्यक्तीत हेच प्रमाण ३.५ ते ४.५ एवढे आहे. अगदी लहान वयातच याचा धोका वाढला आहे. यासाठी नियमित व्यायाम यासोबत योग्य आहार गरजेचा आहे. आज जगभर जागतिक हृदय दिन साजरा होत आहे. लोकांना याची माहिती मिळावी त्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज तुम्हाला हृदय आरोग्यदायी ठेवण्यासाठी आहारात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याची माहिती देणार आहोत.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी तुमच्या डायटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा उपयोग करा. यामध्ये तुम्ही भेंडी, वांगी,बीन्सचा वापर करू शकता. शरीरीतील कोलेस्ट्राल कमी करण्यास हे मदत करतात. शिवाय हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. तुम्ही हिरव्या पालेभाज्यात मेथी, पालक, शेपू, पोकळा अशा भाज्यांचा देखील समावेश करू शकता. बऱ्याचदा लहान मुले भेंडी खायला कुरकुरतात अशावेळी भेंडी फ्राय किंवा भारतीय मसाल्यांचा वापर करून भेंडी बनवू शकता.

डेअरी पदार्थ

डेअरी पदार्थात पनीर, दूध,दह्यात भरपूर पोषक तत्वे असतात. हे खाल्याने फक्त हार्टच नाही तर संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. पनीर तुम्ही फ्राय करूनही खाऊ शकता.

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्समध्ये बदाम आणि अक्रोड जास्त खाल्ले गेले पाहिजेत. यात व्हिटामीन आणि भरपूर पोषक तत्वे असतात. जे हार्ट ला हेल्दी ठेवण्यास मगत करतात.

फळांचा करा समावेश

फळांमध्ये पेरू, संतरे, सफरचंद सारख्या फळात न्यूट्रिशन्स भरपूर प्रमाणात असतात. यात असणाऱ्या व्हिटामीन, मिनरल, फायबरचा शरीरासाठी खूप फायदा होतो. या फळांचा वापर करा.

गव्हाचा करा वापर

गव्हापासून तयार झालेला आटा, ब्रेड, डाळ यांचा समावेश करा.यात व्हिटामीन, आयरन, डाइटरी, फायबर याचे प्रमाण अधिक असते.

loading image
go to top