World Kindness Day 2021; दुसऱ्याशी प्रचंड दयेनं अन् प्रेमानं कसं वागाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Kindness Day 2021; दुसऱ्याशी प्रचंड दयेनं अन् प्रेमानं कसं वागाल?

जागतिक दयाळूपणा दिवस (World Kindness Day) हा एकमेकांशी, स्वतःशी आणि जगाप्रती दयाळू पणे वागण्याचे महत्त्व वाढविण्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

World Kindness Day 2021; दुसऱ्याशी प्रचंड दयेनं अन् प्रेमानं कसं वागाल?

World Kindness Day 2021 :दया म्हणजे एखाद्यासाठी मनात चांगला हेतू, प्रेमळपणा, करुणा आणि प्रेम असणे. आपल्या रोजच्या धावळपळीच्या जीवनात आपल आपले मित्र, मैत्रिणीं, आपले कुंटबीय, एखादी खास व्यक्ती, किंवा अनोळखी व्यक्तीसोबत वागताना समाधानकारक वागणूक देऊ शकत नाही अशावेळी एखाद्यासोबत आपण दयाळूपणे वागलो तर आपल्या ह्रदय आनंदाने भरुन जाते.

जागतिक दयाळूपणा दिवस(World Kindness Day) हा जागतिक दिन एकमेकांसोबत, स्वत:सोबत आणि जगासोबत दयाळूपणे वागण्याच्या भावनेला महत्त्व देण्यासाठी जागतिक पातळीवर 13 नोव्हेंबरला साजरा केला जातो. ''करुणा आपल्या एकमेकांसोबत जोडून ठेवते आणि त्यामध्ये अफाट शक्ती आहे की दोन राष्ट्रंमधील मतभेदही मिटवू शकते.

हेही वाचा: वजन कमी करताय? मग, ब्रेकफास्टमध्ये घ्या 'हे' हेल्दी ड्रिंक्स्

जागतिक दयाळूपणा दिनाचा इतिहास ( History and Significance)

जागतिक दयाळूपणा दिनाचा इतिहास 1997 चा आहे जेव्हा जागतिक दयाळू चळवळीअंतर्गत टोकियो, जपान येथे जगभरातील समविचारी संघटनांना एकत्र आणण्यासाठी पहिली परिषद आयोजित केली होती कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या अनेक देशांमध्ये हे साजरा होतअसल्याचे निदर्शनास येते. 1998 मध्ये वर्षातून एक दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक नव्या वर्षासह जागतिक दयाळू दिनाला स्विकार करण्यास सुरूवात झाली.

2005 मध्ये युके(UK) मध्ये दयाळू चळवळीला सुरूवात झाली आणि 2009 मध्ये सिंगापूरमध्येने या चळवळीमध्ये सहभाग नोंदविला. युके(UK- 2010), ऑस्ट्रेलिया (Australia- 2012), फ्रान्स (France-2015), युएसए (USA- 2018) आणि 2019 पर्यंत ही जागतिक दयाळूता चळवळ एकूण 27 देशांपर्यंत पोहचली. अनेक दशकांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, जागतिक दयाळूता चळवळीला अखेर स्वित्झर्लंडमध्ये अधिकृत एनजीओ म्हणून मान्यता मिळाली.

हेही वाचा: 'गजरा मोहब्बतवाला', लग्नात गजरा माळण्याच्या नव्या ट्रीक

एखाद्यासोबत दयाळूपणे वागण्यामुळे तुम्ही फक्त इतरांचाच नव्हे तर स्वत:चाही आयुष्यातही खूप आनंद निर्माण करता. तुम्ही जर एखाद्यासोबत असे काहीतरी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी योग्य आहे.

एखाद्याशी दयाळूपणे वागण्याचे काही मार्ग (ways to be kind)

  • एखादा प्रेरणादायी मेसेज आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा कुटुंबियांना पाठवू शकता.

  • एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी चौकटीबाहेर पडून काहीतरी करा

  • तुमच्या मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईकांसोबत तुम्ही बरेच दिवस बोलला नसाल तर त्यांच्याशी वेळ काढून बोला.

  • एखाद्याचे मनापासून कौतुक करा

  • तुमच्या शेजाऱ्यांना तुम्ही काहीतरी ताजे स्नॅक्स किंवा जेवण देऊन सरप्राईज करा.

  • लिंकड् इनवर तुमच्या एखाद्या मित्रासाठी रिकमेंडशन लिहा. तुमच्या मित्र असलेल्या माजंर किवा कुत्र्यांना प्राण्यांच्या निवारा केंद्रामध्ये सोडा.

  • चांगले श्रोते व्हा. समोरच्याला काय सांगायचे आहे, बोलायचे आहे हे मत न बनवता शांतपणे ऐकून घ्या.

  • स्वतःसोबत दयाळूपणे वागा आणि एक दिवस सुट्टी घ्या

loading image
go to top