World Laughter Day 2024 : जागतिक हास्य दिन कधी सुरू झाला अन् हसणे का महत्वाचे आहे? वाचा एका क्लिकवर

World Laughter Day 2024 : हसणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
World Laughter Day 2024 :
World Laughter Day 2024 :Sakal

World Laughter Day 2024 :

दरवर्षी 5 मे हा दिवस जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. निरोगी राहण्यासाठी केवळ निरोगी आहार आणि व्यायाम करणे महत्त्वाचे नाही तर तणावमुक्त जीवन जगणे देखील महत्त्वाचे आहे. तणावामुळे अनेक आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो आणि त्यामुळेच लोक तणाव कमी करण्यासाठी लाफ्टर थेरपीसारख्या तंत्राची मदत घेतात.

जागतिक हास्य दिनाचा इतिहास काय आहे?

जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस 1998 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यामागील कथा अशी आहे की, हंसी योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी याची सुरुवात केली होती.

चेहऱ्याच्या फीडबॅक हायपोथिसिसपासून प्रेरणा घेऊन ते म्हणाले की चेहऱ्याच्या हालचालींचा माणसाच्या भावनांवर प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे हा दिवस भारतात पहिल्यांदा 10 मे 1998 रोजी मुंबईत साजरा करण्यात आला आणि आज हा दिवस जगभरातील 70 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

World Laughter Day 2024 :
World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

जागतिक हास्य दिनाचा उद्देश काय आहे?

लोकांमध्ये एकता आणि सद्भावना वाढवणे हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा एक उद्देश म्हणजे लोकांमध्ये आनंद वाटून घेणे. एवढेच नाही तर हसण्याने तुमचे आरोग्यही निरोगी राहते. म्हणूनच अनेक लोक सकाळी किंवा संध्याकाळी उद्यानांसारख्या ठिकाणी जमतात आणि जोरात हसतात.

हसण्याचे आरोग्यदायी फायदे

तणाव कमी करण्यासाठी हसणे फायदेशीर ठरते.

हसण्याने तुमचा मूड चांगला राहतो. तसेस मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते.

हसल्याने सकारात्मक उर्जा वाढते. त्यामुळे, मित्र, सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत हसण्यानेही भावनिक नातेसंबंधात सकारात्मकता येते.

हसण्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कारण ते तणाव संप्रेरक कमी करते.

हसण्याने तुमचा कामावरचा फोकसही वाढतो.

हसल्याने आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com