World Population Day 2023: 'या' थीमवर साजरा होणार वर्ष 2023 चा जागतिक लोकसंख्या दिन

जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो.
World Population Day
World Population Daysakal

जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. जगभर लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचीही या दिवशी जाणीव करून दिली जाते.

11 जुलै 1989 रोजी यूनाइटेड नेशन्स ऑर्गेनाइजेशनने प्रथमच जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी वाढत्या लोकसंख्येच्या समस्येवर जगभर चर्चा होते. 11 जुलै 1990 रोजी हा दिवस पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यासाठी सुमारे 8 उद्दिष्टे आहेत.

जागतिक लोकसंख्या दिवस 2023 या थीमवर साजरा केला जाईल

दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस जगभरात वेगवेगळ्या थीमवर साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन 2023 ची थीम आहे ‘Imagine a world where everyone all 8 billion of us has a future bursting with promise and potential. याचा अर्थ' जगाची कल्पना अशी करा जिथे आपल्यापैकी सर्व 8 अब्ज लोकांचे भविष्य वचन आणि क्षमतांनी भरलेले आहे'. या ध्येयाच्या दिशेने जगातील लोकांना एकत्र वाटचाल करायची आहे.

जगाची लोकसंख्या 8 अब्जच्या पुढे गेली आहे

सध्या जगाची लोकसंख्या 8 अब्जांच्या पुढे गेली आहे आणि त्यामुळे अनेक दुष्परिणामही दिसून येत आहेत. जगातील वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणात झपाट्याने बदल होत आहेत.

लोकांना आरोग्य, शिक्षण यासह अनेक समस्या भेडसावत आहेत, अशा परिस्थितीत जागतिक लोकसंख्या दिनाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे महत्त्वाचे आहे.

लोकसंख्या दिनाचा इतिहास

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये जागतिक लोकसंख्या दिनाची सुरूवात केली होती. 5 अब्जांवर जगाची लोकसंख्या पोहोचली होती, त्यावर संयुक्त राष्ट्रसंघाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कुटुंब नियोजनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतरच जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी साजरा केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com