
World Television Day 2024: दरवर्षी २१ नोव्हेंबरला जागतिक टेलिव्हीजन दिवस साजरा केला जातो. या एका आविष्कारामुळे संपूर्ण जगभर भरपूर क्रांती झाली. दृक्श्राव्य माध्यमाच्या यामुळे आपल्याला जगभरात चालू असलेल्या सगळ्या घडामोडी कळतात. टेलिव्हिजन हे जनसंवादाचे असे माध्यम आहे ज्यामुळे आपण मनोरंजन, शिक्षण, चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादींशी जोडलेले राहतो. त्यामुळे संपूर्ण जगाची माहित आपल्यापर्यंत काही क्षणातच पोचते.
ब्लॅक अँड व्हाईट ते स्मार्ट टीव्ही, एक चॅनल- एक कार्यक्रम ते अनेक चॅनल आणि असंख्य कार्यक्रम यापर्यंत टेलिव्हिजनच्या माध्यमाने खूप प्रगती केली आहे. म्हणूनच टेलिव्हिजन दिन दरवर्षी त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो.
आज क्वचितच असे घर असेल जिथे आपल्याला टीव्ही दिसणार नाही.