
frog removal tips: पावसाळा सुरु होताच आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे डास, किड्यांसोबत बेडूक देखील घरात शिरतात. अनेक लोकांना बेडकांची भीती वाटते, अशावेळी बेडकांना हाकलणे खुप अवघड जाते. पावसाळ्यात घराजवळ पाणी साचलेले असेल तर तेव्हाच येतात. तसेच घरात असे अनेक भाग असतात जिथे बेडूक येऊ शकतात. जसे की पाण्याची टाकी, बाग यासारख्या ठिकाणी सहज बेडूक येतात. तुम्ही अनेकांना हातात बेडूक घेऊन फेकताना पाहिले असेल, पण ही योग्य पद्धत नाही. यामुळे बेडुक मरू शकते. त्यांना न मारताही घराबाहेर काढण्यासाठी पुढील घरगुती आणि सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.