
आरोग्यम धनसंपदा’ असे म्हटले जाते. आपले शरीर सुदृढ असेल तर मनुष्य नेहमी समाधानी राहतो. व्यायाम, योगासने, प्राणायाम लहानापासून ज्येष्ठांपर्यंत करत असतात. परंतु सध्या व्यायाम, योगासने, प्राणायाम करण्यासाठी ऑनलाइनला अधिक पसंती मिळत आहे. थंडीच्या दिवसांत ऑनलाइन मार्गदर्शन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.