Yoga Tips : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सर्वात सोपी आणि फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Yoga Tips : निरोगी जीवनशैलीसाठी योगा, प्राणायाम यांचा नियमित सराव आणि संतुलित आहार अतिशय फायदेशीर आहे.
Yoga Tips
Yoga Tipsesakal

Yoga Tips : निरोगी जीवनशैलीसाठी योगा, प्राणायाम यांचा नियमित सराव आणि संतुलित आहार अतिशय फायदेशीर आहे. जर या दोन्ही गोष्टींची काळजी लहानपणापासून घेतली गेली की, आरोग्य निरोगी राहते. अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी योगासने उपयुक्त ठरतात. योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने शरीर निरोगी राहत नाही तर आपले मन ही स्थिर राहते.

योगासनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो. या योगासनांचे फायदे देखील विविध प्रकारचे आहेत. काही आरोग्यतज्ज्ञ नियमितपणे योगा करण्याचा सल्ला देखील देतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आणि करायला सोपी असणारी योगासने देखील आहेत.

ही योगासने लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण मिळून करू शकतात. या योगासनांमुळे मुलांची एकाग्रता आणि उंची वाढण्यास मदत होते. त्यासोबतच, प्रौढ लोकांची रोगप्रतिकारकशक्ती देखील मजबूत होते. चला तर मग सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर असणाऱ्या या सोप्या योगासनांबद्दल जाणून घेऊयात.

Yoga Tips
Yoga For Sinus Problems : ‘या’ योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने सायनसच्या समस्येपासून मिळेल आराम

मार्जारासन

पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाच्या नावाप्रमाणेच याची पोझिशन असते. मार्जारासन या योगासनात व्यक्तीची स्थिती ही मांजराप्रमाणे असते.

हे योगासन करायला अतिशय सोपे आणि सहज आहे. लहान मुले आणि अगदी वयोवृद्ध देखील हे योगासन आरामात करू शकतात. हे योगासन करताना सर्वात आधी योगा मॅटवर टेबलाच्या स्थितीमध्ये शरीराची स्थिती ठेवा. आता तुमचे दोन्ही हात, गुडघे, नितंब, खांदे आणि कोपर जमिनीवर सरळ रेषेत ठेवा. त्यानंतर, तुमची मान आणि डोके सरळ ठेवा, या स्थितीमध्ये पाठीचा कणा वाकवू नका.

तुमच्या शरीराचे वजन हे गुडघ्यांवर सारखेच ठेवा. त्यानंतर, तुमची कंबर वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा. आता दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे डोके वरच्या दिशेला करा. या स्थितीमधये तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. काही सेकंदानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

शीर्षासन

मेंदू शांत आणि निरोगी ठेवण्यासाठी हे योगासन अतिशय उपयुक्त आहे. या योगासनाचा नियमित सराव केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि शांत झोप देखील लागते. तसेच, थायरॉईड आणि पॅराथायरॉईड ग्रंथींचे कार्य देखील सुधारते. या योगासनाचा नियमित सराव केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यास आणि एकाग्रता राखण्यास मदत होऊ शकते.

शीर्षासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा आणि तुमचे दोन्ही हात जमिनीला समांतर ठेवा आणि तुमचे दोन्ही पाय हवेत वरच्या दिशेला न्या. तुमचे शरीर सरळ रेषेत येईपर्यंत हे पाय उचला. आता तुमचे डोके आणि योगा मॅटवर आणि पाय हवेतच राहतील.

तुमच्या क्षमतेनुसार या योगासनात राहा. त्यानंतर, सामान्य स्थितीमध्ये या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीचा आधार घेऊन ही शीर्षासन करू शकता. हे योगासन पहिल्यांदाच करत असाल तर योगातज्ज्ञाची मदत तुम्ही घेऊ शकता.

Yoga Tips
Yoga For Body Pain : वाढत्या वयाबरोबर शरीराची अंगदुखी वाढलीय? मग ‘या’ योगासनांमुळे तुम्हाला मिळेल आराम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com