Yoga Tips: योगासने करण्याचा योग्य क्रम कोणता? वाचा एका क्लिकवर

Yoga Tips: योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण अनेक लोकांना योगा करण्याचा योग्य क्रम माहिती नसतो.
Yoga Tips
Yoga TipsSakal
Updated on

Yoga Tips: निरोगी राहण्यासाठी योगा करणे फायदेशीर असते. पण योग करताना योग्य क्रम माहिती असणे गरजेचे असते. कोणत्या योगानंतर कोणता योग करावा? प्रत्येकाला याबद्दल पूर्ण माहिती नसते. त्यामुळे योगासने करण्याचा योग्य क्रम काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन योगा केल्याने त्याचा पुरेपूर फायदा होईल.

चक्रासन आणि पवनमुक्तासन

जर तुम्हाला शरीर लवचिक ठेवायचे असेल आणि पाठदुखीपासून मुक्ती मिळवायची असेल तर चक्रासन करावे. त्यानंतर पवनमुक्तासन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही विपरीत प्रकृतीची योगासने शरीराचा समतोल राखण्यास मदत करतात.

चक्रासन आणि समकोनासन

पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी चक्रासन करत असाल तर त्यासोबत समकोनासन करावे. यामुळे मणक्याच्या हाडांमध्ये लवचिकता कायम राहते

Yoga Tips
Yoga Tips: पाच वर्षांपर्यंतच्या मुलांनी किती वेळ व्यायाम करावा? वाचा तज्ञ सांगतात

सर्वांगासन आणि मत्स्यासन

शरीराचा समतोल राखण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढवण्यासाठी खांद्यावर उभे राहणे म्हणजेच सर्वांगासन करणे फायदेशीर आहे. पण सर्वांगासन केल्यानंतर मत्स्यासन करावे. मत्स्यासन केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो आणि हाडे आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. सर्वांगासन केल्यानंतर मत्स्यासन नक्कीच करावे.

पश्चिमोत्तासन आणि पूर्वोतासन

पश्चिमोत्तनासनात पुढे बसताना संपूर्ण शरीर पुढे झुकलेले असते. त्यामुळे शरीरात उर्जेचे संतुलन राहते. तसेच पचनसंस्था सुरळित कार्य करते. पश्चिमोत्तानासन केल्यानंतर पूर्वोत्तनासन करावे. जेणेकरून मणक्याच्या हाडांमध्ये अंतर्गत ताण आल्यानंतर त्यांना बाहेरून खेचून आराम दिला जातो. याशिवाय पूर्वोत्तन करण्याचे अनेक फायदे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com