रत्नागिरी-सिंधुदुर्गात 64 टक्के मतदान; 'या' 9 उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद, कोण मारणार बाजी?

चिपळूण विधानसभा (Chiplun Assembly) मतदारसंघात सर्वाधिक ५२.६२ टक्के मतदान झाले.
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituencyesakal
Summary

कडक उन्हामुळे मतदारांनी संध्याकाळच्या सत्रात केंद्रावर गर्दी केली. कोकण नगर, मिरकरवाडा आदी केंद्रावर अचानक मतदारांची गर्दी झाल्यामुळे काहीसा गोंधळ उडाला.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) आज सर्वत्र शांततेत ६४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी ५ पर्यंत ४ लाख ८ हजार ७४५ पुरुष, तर ३ लाख ९८ हजार ८१६ इतक्या महिला अशा एकूण ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Satara Lok Sabha : साताऱ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल; माजी मुख्यमंत्र्यांना विश्वास

दिवसअखेर ६२ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे ९ उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मतदान मशीनमध्ये (Electronic Voting Machine) बंद झाले. सायंकाळी काही मतदान केंद्रांवर अचानक गर्दी झाल्यामुळे गोंधळ झाला होता; परंतु प्रशासनाने ही परिस्थिती चांगली हाताळली. मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ५३.७५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यंत ८.१७ टक्के, ११ पर्यंत २१.१९ टक्के, एकपर्यंत ३३.९१ टक्के तर तीनपर्यंत ४४.७३ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या चौथ्या टप्प्यातील दोन तासांत ९.०२ टक्के मतदान झाले.

यामध्ये चिपळूण विधानसभा (Chiplun Assembly) मतदारसंघात सर्वाधिक ५२.६२ टक्के मतदान झाले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ४९.८३ टक्के मतदान झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात ४७.३१ टक्के मतदान झाले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ५५.१४ टक्के, कुडाळ मतदारसंघात ५९.०९ आणि सावंतवाडी मतदारसंघात ६९.०३ टक्के मतदान झाले आहे. एकूण १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांपैकी ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी मतदानाचा हक्क सायंकाळी ५ पर्यंत बजावला. ही एकूण टक्केवारी ५५.६३ आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता असून, ६४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २०१९ च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी ६१.९९ टक्के होती. तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचा अंदाज आहे.

कडक उन्हामुळे मतदारांनी संध्याकाळच्या सत्रात केंद्रावर गर्दी केली. कोकण नगर, मिरकरवाडा आदी केंद्रावर अचानक मतदारांची गर्दी झाल्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. केंद्रावर ताण पडल्यामुळे मतदारांनी चुळबुळ सुरू केली. मिरकरवाडा केंद्रावर तर मतदारांनी गोंधळ घातला अखेर प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी जाऊन ही परिस्थिती नियंत्रणात आणली. रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार शकील अब्दुल करीम सावंत, महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक भाऊराव राऊत, अपक्ष अमृत अनंत तांबडे, सैनिक समाज पक्षाचे उमेदवार सुरेश गोविंदराव शिंदे, विनायक राऊत यांच्या नावाशी मिळतेजुळते नाव असलेल्या विनायक लवू राऊत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लहु आयरे, वंचित आघाडीचे मारूती रामचंद्र जोशी, महायुतीचे उमेदवार नारायण तातू राणे, बहुजन मुक्त पार्टीचे अशोक गंगाराम पवार, या ९ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे. ४ जूनला निकालादिवशी त्यांचे भवितव्य ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी आज अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला.

रायगडमध्ये पन्नास टक्के मतदान

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळी ५ पर्यंत ५०.३१ टक्केच सरासरी मतदान झाले. घटलेल्या टक्केवारीने प्रमुख उमेदवारांची चिंता वाढवली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीच्या प्रमाणात हे सर्वात कमी मतदान आहे. मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत सर्वात जास्त टक्केवारी गुहागर मतदारसंघात असून महाड विधानसभेतील मतदारांचा निरुत्साह दिसून आला.

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार

बाळगंगा प्रकल्पाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने त्यांची मनधरणी करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला होता; परंतु त्यात शेवटपर्यंत यश आले नाही.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Kolhapur : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापुरात चुरशीने 71 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान; निकाल 4 जूनला

घटता टक्का कोणाला लाभदायक?

मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीचा विपरीत परिणाम येथील राजकीय समिकरणावरही होण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६१.७७ टक्के मतदान झाले होते, त्या वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने एकूण ९ लाख ४२ हजार मते मिळवली होती. आताच्या निवडणुकीत रायगड लोकसभेसाठी १६ लाख ६८ हजार मतदारांना मतदानाचा हक्क होता. यातील फक्त ८ लाख मतदारांनीच मतदानाचा अधिकार बजावला आहे. विजयी होण्यासाठी चार लाखाची गोल्डन फिगर गाठावी लागणार आहे. यापुर्वी महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गिते या दोघांनीही गाठलेली असल्याने कोण बाजी मारेल याबद्दल तक्रवितर्क केले जात आहेत.

देशात भाजपचे चारशे खासदार निवडून येणार आहेत. या चारशेमध्ये रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातही कमळ फुलणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील भाजपच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. जनतेचे प्रेम अनुभवता आले. माझ्यासाठी आजचा पेपर अत्‍यंत सोपा होता.

- नारायण राणे, उमेदवार, भारतीय जनता पार्टी

अडीच लाखांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव करून मी निश्‍चितपणे निवडून येणार आहे. आज सकाळपासूनच मतदारांचा उत्‍स्‍फूर्त पाठिंबा अनुभवता आला. वातावरण सकारात्‍मक होते. मतदारांच्या चेहऱ्यावरही आनंद आणि आपुलकी दिसली. त्‍यामुळे विजयाबाबत मी निश्‍चिंत आहे.

- विनायक राऊत, उमेदवार, शिवसेना ठाकरे गट

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Satara Lok Sabha : साताऱ्यात चुरशीने 63.07 टक्के मतदान; प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी?

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना निश्‍चितपणे मोठे मताधिक्‍य मिळणार आहे. राणेंच्या प्रचारासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. इतर मतदारसंघाबरोबर सावंतवाडी मतदारसंघातूनही राणेंना मोठे मताधिक्‍य मिळणार आहे.

- दीपक केसरकर, शिक्षणमंत्री, शिवसेना शिंदे गट

सायंकाळी ५ पर्यंतची टक्केवारी

  • चिपळूण - ५२.६२

  • रत्नागिरी - ४९.८३

  • राजापूर - ४७.३१

  • कणकवली - ५५.१४

  • कुडाळ - ५९.०९

  • सावंतवाडी- ६०.३०

दृष्टिक्षेपात

  • दुपारच्या सत्रामध्ये गर्दी कमी

  • शहरी भागात तरुणांचा वाढता ओघ

  • सायंकाळी गर्दीने गोंधळ, प्रशासनाची धावपळ

  • मतदारांच्या दिमतीला प्रशासन

  • उन्हाच्या फटक्याने टक्का घसरला

  • मच्छीमारी बंद ठेवून मतदानाला

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Sangli Lok Sabha : सांगलीत ईर्ष्येने 61 टक्क्यांवर मतदान; तीन पाटलांचे भवितव्य यंत्रात कैद

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

शहरातील तेलीआळी नाक्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याने राजकीय वातावरण तापले. विनायक राऊत आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत फटाके फोडले. यावेळी नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत महायुतीचे पदाधिकारी आमने-सामने आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

  1. चिपळूण ः ६९ हजार ७८३ पुरुष, ७२ हजार १७५ महिला असे एकूण १ लाख ४१ हजार ९५८, ५२.६२ टक्के.

  2. रत्नागिरी ः ८० हजार ७०२ पुरुष, ८२ हजार २२४ महिला, इतर १ असे एकूण १ लाख ६२ हजार ९२७, ५७.४६ टक्के.

  3. राजापूर ः ५३ हजार ९७१ पुरुष, ५६ हजार ६०४ महिला असे एकूण १ लाख १० हजार ५७५, ४७.३१ टक्के

  4. कणकवली ः ६४ हजार ७८९ पुरुष, ६० हजार ७८३ महिला असे एकूण १ लाख २५ हजार ५७२, ५५.१४ टक्के.

  5. कुडाळ ः ६७ हजार ६३३ पुरुष, ६१ हजार ८१७ महिला असे एकूण १ लाख २९ हजार ४५०, ६०.९६ टक्के.

  6. सावंतवाडी ः ७१ हजार ८६७ पुरुष, ६५ हजार २१३ महिला असे एकूण १ लाख ३७ हजार ८०, ६१.०७ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com