'मविआ'ला आपल्या विरोधात अद्याप तगडा उमेदवार देता आलेला नाही, यातच महायुतीची ताकद दिसून येते - रणजितसिंह निंबाळकर

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, आरपीआय, रयत क्रांती संघटना आदी तुल्यबळ पक्ष आमच्या सोबत आहेत.
RanjitSingh Naik Nimbalkar
RanjitSingh Naik Nimbalkaresakal
Summary

''माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघांतून महायुतीचेच उमेदवार निश्चितपणे विजयी होतील.’’

फलटण शहर : माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) देशातील सर्वाधिक चर्चेचा व काम झालेला आहे. येथील ८५ टक्के लोकांचे पाठबळ आमच्या पाठीशी असेल. महाविकास आघाडीला आपल्या विरोधात अद्याप तगडा उमेदवार देता आलेला नाही. यातच महायुतीची ताकद दिसून येते. माढा व सोलापूर लोकसभेतून भाजपचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी व्यक्त केला.

टेंभुर्णी येथे भाजपच्या माढा कोअर कमिटीची बैठक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार निंबाळकर बोलत होते. महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. चर्चा होऊन त्यानंतर लवकरच प्रचाराचा नारळ फोडला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

RanjitSingh Naik Nimbalkar
Satara Loksabha : साताऱ्यात पाहायला मिळणार तगडी फाईट; उदयनराजेंविरोधात बिचुकले उतरणार लोकसभेच्या रिंगणात!

खासदार निंबाळकर म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार ठरवता आला नाही. यातच महायुतीची ताकद दिसून येते. समोर उमेदवार कोण असावा, हे अद्याप ठरवता येत नसल्याने त्यांना आपल्या विरोधात तगडा उमेदवार देता येईल, असे आपणास वाटत नाही. पक्षांतर्गत व महायुतीमधील घटक पक्षातील नेत्यांकडून त्यांना विरोध होत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी किरकोळ मतभेद हे सर्वच पक्षात अथवा सर्व ठिकाणी असतात. निश्चितपणे पक्षाची व आमची भूमिका ही नम्रतेची आहे. गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये पूर्वीची महायुती व आजची महायुती ही वेगवेगळ्या विचारांची व बैठकींची होती. त्यामुळे तत्कालीन लोकांचे जे काही समज गैरसमज असतील.

RanjitSingh Naik Nimbalkar
Kolhapur Loksabha : आता आमचं नाही, 'आपलं' ठरलंय म्हणायचं; संजय मंडलिकांनी घेतली महाडिकांची भेट, चर्चांना उधाण

त्यांनाही भेटून आम्ही एकसंध बनून सर्व जण निवडणुकीस सामोरे जाणार आहोत. आपणापुढे २०१९ च्या निवडणुकीत आव्हान होते; परंतु यावेळेस महायुतीची ताकद वाढली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, आरपीआय, रयत क्रांती संघटना आदी तुल्यबळ पक्ष आमच्या सोबत आहेत. याशिवाय गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून येथे हजारो कोटी रुपयांची विकासकामे या मतदारसंघामध्ये झालेली आहेत. त्यामुळे लोक समाधानी आहेत. त्यामुळे माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघांतून महायुतीचेच उमेदवार निश्चितपणे विजयी होतील.’’

RanjitSingh Naik Nimbalkar
'मला राष्ट्रवादी सोडताना वाईट वाटलं, पण शरद पवारांना भेटण्यासाठी..'; राऊतांवर टीका करत काय म्हणाले केसरकर?

मोहिते पाटील व रामराजे यांचीही भेट घेणार

पक्षातील व युतीतील नाराज असणाऱ्यांबरोबर वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरू आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास.’ सर्वांना बरोबर घेऊनच ही लढाई आम्ही लढणार आहोत. या दृष्टीने पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रयत्नशील असून, तशी व्यूहरचना ते करीत आहेत. उमेदवार म्हणून आपण मोहिते- पाटील कुटुंबीय व रामराजे नाईक निंबाळकर यांना भेटणार आहोत. त्याचप्रमाणे पक्ष पातळीवरून ज्या सूचना देण्यात येतील, त्यांनाही जाऊन आपण भेटणार आहोत, असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com