Baharampur Constituency Lok Sabha Election Result : अधीर रंजन चौधरी यांच्या 'बालेकिल्ला'ला युसूफ पठाणने लावला सुरूंग

Baharampur Constituency Lok Sabha Election Result Yusuf Pathan vs Adhir Ranjan News : बहरामपूर लोकसभा मतदारसंघ खूप महत्त्वाचा मानला जातो. येथे अल्पसंख्याकांनी सुरुवातीपासूनच निर्णायक भूमिका बजावली आहे.
Baharampur Lok Sabha 2024 Yusuf Pathan vs Adhir Ranjan
Baharampur Lok Sabha 2024 Yusuf Pathan vs Adhir Ranjan

Baharampur Constituency Lok Sabha Election Result : बहरामपूर लोकसभा मतदारसंघ खूप महत्त्वाचा मानला जातो. येथे अल्पसंख्याकांनी सुरुवातीपासूनच निर्णायक भूमिका बजावली आहे आणि तो काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला आता युसूफ पठाणने सुरूंग लावला आहे.

बहरामपूरमध्ये अधीर रंजन चौधरी यांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 4.55 ला अपडेट झालेल्या आकडेवारीनुसार युसूफ पठाण 66 हजार 784 मतांना आघाडीवर आहे.

अधीर रंजन चौधरी 1999 पासून सातत्याने या जागेवर विजयी होत होते. सहाव्यांदा त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते.

पण यावेळी तृणमूल काँग्रेसने 52 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या भागात प्रथमच अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात तगडा मुस्लिम उमेदवार उभा केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली, तर भाजपने निर्मल कुमार साहा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बहरमपूर लोकसभा जागेवर तिरंगी लढत पाहायला मिळाली.

Baharampur Lok Sabha 2024 Yusuf Pathan vs Adhir Ranjan
Jalna Constituency Lok Sabha Election Result : जालन्यात रावसाहेब दानवे मारणार पुन्हा एकदा विजयाचा सिक्सर, की 'मविआ' घेणार विकेट?

मुस्लिम मतदार महत्वाचा -

2011 च्या जनगणनेनुसार, बहरामपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे 52 टक्के मुस्लिम मते आहेत तर 13 टक्के दलित मतदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी मोठ्या फरकाने विजयी झाले होते आणि त्यांची मते 45.47 टक्के होती.

मात्र, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजपर्यंत टीएमसीने अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात कधीही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नव्हता. ही पहिलीच निवडणूक आहे जेव्हा अधीर रंजन चौधरी यांना मुस्लिम उमेदवाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तेथील मुस्लिम मतदार महत्वाचा असणार आहे.

Baharampur Lok Sabha 2024 Yusuf Pathan vs Adhir Ranjan
Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : पुन्हा विखे की यावेळी लंके? कोणाला मिळणार दिल्लीत जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी?

बहरामपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ -

बहरामपूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सात जागा आहेत. यामध्ये बरवान (अनुसूचित जाती), कांडी, भरतपूर, रेजीनगर, बेलडांगा, बेरहामपूर आणि नौदा यांचा समावेश आहे.

Baharampur Lok Sabha 2024 Yusuf Pathan vs Adhir Ranjan
Amaravati Constituency Lok Sabha Election Result: 'प्रहार'च्या प्रहारानंतर अमरावती कोणाकडं जाणार? राणा की वानखेडे?

बहरामपूर लोकसभा मतदारसंघातील 2019 चे चित्र -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनी ही जागा जिंकली होती, त्यांना 5,91,147 मते मिळाली होती. तर, तृणमूल काँग्रेसच्या अपूर्वा सरकार 5,10,410 मतांसह दुसऱ्या स्थानावर होत्या. आणि भाजपचे कृष्णा जुआदार आर्य 1,43,038 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.

2019 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाने बंगालमध्ये 22 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला 18 जागा तर काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या.

बहरामपूर लोकसभा मतदारसंघातील 2014 चे चित्र -

2014 च्या लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या इंद्रनील सेन यांचा पराभव केला होता. अधीर चौधरी यांना 5,83,549 मते मिळाली, तर इंद्रनील सेन यांना 2,26,982 मते मिळाली होती, आणि रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे प्रमोथ मुखर्जी तिसऱ्या स्थानावर आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये 34 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 2 जागांवर, काँग्रेसने 4 जागांवर आणि सीपीएमने 2 जागांवर विजय मिळवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com