Latur Loksabha Constituency : धर्माच्या नावावर भाजपची पोळी : थोरात

‘‘भाजपकडून धर्माच्या नावावर मतभेद निर्माण करून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Latur Loksabha Constituency
Latur Loksabha Constituencysakal

लातूर : ‘‘भाजपकडून धर्माच्या नावावर मतभेद निर्माण करून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला कारभार पाहता राज्यघटना व लोकशाही धोक्यात आली आहे.

या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यघटना, लोकशाही वाचवायची आहे,’’ असे मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी येथे व्यक्त केले. काँग्रेसतर्फे शुक्रवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री दिलीप देशमुख, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार अमित देशमुख आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी पक्षातर्फे शक्ती प्रदर्शन करीत डॉ. शिवाजी काळगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.‘‘राज्यात भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने ७० हजार कोटींचा गैरव्यवहार केला, असे पंतप्रधान मोदी एका सभेत सांगतात आणि त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करतात. त्यांच्याकडे ‘धुलाई यंत्र’ आहे,’’ असे थोरात म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com