Loksabha election 2024 : सुनेत्रा पवार आहेत अब्जाधीश; 'एवढ्या' कोटींची आहे संपत्ती...

Sunetra Pawar
Sunetra Pawarsakal
Updated on

पुणेः बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या अब्जाधीश असून, सुनेत्रा पवार, अजित पवार आणि कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता १२३ कोटी ४६ लाख १७ हजार ७५८ रुपये इतकी आहे.

सुनेत्रा पवार यांनी आज (ता. १८) त्यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे आहे. सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली असून, शेती आणि व्यवसाय करतात.

त्यांच्या हातामधील रोख रक्कम ३ लाख ९६ हजार इतकी आहे. बॅंकेमध्ये ५ कोटी ३० लाख ७५ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. ६३ लाख ७३ हजार ३६० रुपयांचे दागिणे आहेत, यामध्ये ७५ किलो चांदी, एक किलो सोने, हिऱ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर एक ट्रॅक्टर, दोन ट्रेलर आहेत, पण त्यांच्याकडे एकही कार नाही. अजित पवार यांच्या नावावर तीन ट्रेलर, एक ट्रॅक्टर आणि दोन कार आहेत, या वाहनांचे एकूण मूल्य ८६ लाख ४२ हजार १०२ रुपये इतके आहे. पवार कुटुंबीयांची एकूण जंगम मालमत्ता ही २९ कोटी ६५ लाख २९ हजार ८१३ रुपयांची आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नावावर बारामतीतील सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, गोडांबेवाडी येथे ४५ एकर जमीन आहे. तर अजित पवार यांच्या नावावर काटेवाडी, सोनगाव व ढेकळवाडी या तीन ठिकाणी मिळून साडेचार एकर जमीन आहे, त्याचे चालू बाजारभावानुसार एकूण मूल्य १२ कोटी २१ लाख रुपये इतके आहे. काटेवाडी, कल्याणीनगर, औंध, बिबवेवाडी येथे प्रत्येकी एक आणि मुंबई येथे दोन घरे आहेत. स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य ९३.८० कोटी रुपये इतके आहे. तसेच पवार यांनी नणंद सुप्रिया सुळे यांना ३५ लाख तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाख, अजित पवार यांना ६३ लाख २० हजार रुपयांचे कर्ज दिले आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Sunetra Pawar
Prakash Ambedkar: नरेंद्र मोदींची भूमिका हिटलरसारखी ; अकोल्यातील प्रचारसभेत प्रकाश आंबेडकरांनी घेतला समाचार

अशी आहे मालमत्ता

  • सोने - ६३.७३ लाख

  • स्थावर मालमत्ता -९३.८० कोटी

  • बॅंकेतील ठेवी - ५.३० कोटी

  • कर्ज - १६.८६ कोटी

  • वाहने - ८६.४२ लाख

  • शेअर्स - ६६.४८ लाख

  • एकूण - १२३.४६ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com