Lok Sabha Election : 'जनताच आम्हाला चारशे पार घेऊन जाईल'; भाजप नेते माधव भंडारींना विश्वास

राज्यघटनेत तरतूद असलेला समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात येईल.
Lok Sabha Elections Madhav Bhandari
Lok Sabha Elections Madhav Bhandariesakal
Summary

राज्यातील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सांगली : ‘‘लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र हे देशभरातील नागरिकांकडून आलेल्या पंधरा लाख सूचनांच्या आधारे तयार केले आहे. यामध्ये युवा, महिला, गरिबांसाठी विविध योजना आहेत. हे भारतीय जनतेचे संकल्पपत्र आहे. त्यामुळे जनताच आम्हाला चारशे पार घेऊन जाईल,’’ असा विश्वास भाजपचे माध्यम प्रबंधक माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी व्यक्त केला.

भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील (BJP candidate MP Sanjay Patil) यांच्या संपर्क कार्यालयात श्री. भंडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, शहर-जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, दीपक शिंदे, प्रकाश बिरजे, केदार खाडिलकर उपस्थित होते.

Lok Sabha Elections Madhav Bhandari
'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर मंडलिक-मालोजीराजे आले एकत्र; दोघांना एकत्र बघून लोकही झाले अवाक्‌, असं काय घडलं?

श्री. भंडारी म्हणाले, ‘‘भाजपच्या संकल्प पत्रामध्ये युवक, महिला, शेतकरी आणि ग्रामीण या चार घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना सक्षम करून त्यांची उन्नती झाली तर विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. पुढील पाच वर्षे गरिबांना मोफत धान्य देणार आहे. ’’

‘‘देशभरातील तीन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ योजनेतून सक्षम करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. संरक्षण क्षेत्रात गेल्या चार वर्षांत भारत निर्यातदार झाला आहे. २५ हजार कोटींचे संरक्षण साहित्य निर्यात केले आहे. देशाच्या सर्व भागात रोजगार निर्मिती केंद्र उभी राहावित ही सरकारची भूमिका आहे,’’ असे भंडारी यांनी स्पष्ट केले.

Lok Sabha Elections Madhav Bhandari
'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही'; मुख्यमंत्र्यांचा फोन अन् लोकसभा निवडणुकीतून चेतन नरकेंची माघार

ते म्हणाले, ‘‘शेतीसाठी अनेक योजना आणण्यात आल्या असून २२ उत्पादने हमीभावाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. येत्या पाच वर्षांत पाच हजार किलोमीटरचे रेल्वे मार्ग करण्यात येतील. राज्यघटनेत तरतूद असलेला समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात येईल. तसेच ‘एक देश-एक चुनाव’बाबतही प्रयत्न सुरू आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘भाजपने २०१९ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. यामध्ये राम मंदिरची उभारणी, शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, तिहेरी तलाकविरोधात कायदा, कलम ३७० रद्द करणे, शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराची मदत, किसान क्रेडिट कार्ड आदी आश्वासनांचा यात समावेश आहे.’’ संकल्प पत्रांसाठी महाराष्ट्रातून सुमारे एक लाख वीस हजार सूचना आल्या होत्या. त्यामध्ये ४०-४५ टक्के सूचना महिलांकडून आल्या होत्या. यामध्ये शेतमालाला हमीभाव, पिण्याचे पाणी, कोरडवाहू शेतीचा प्रश्न असे मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Lok Sabha Elections Madhav Bhandari
Satara Lok Sabha : साताऱ्यात शिवेंद्रराजेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; उदयनराजेंबाबत नाराजी, शिंदेंना मिळणार सहानुभूती?

‘आमच्या योजना रेवडी नाहीत’

काँग्रेसने गरीब, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांना ‘रेवडी’ म्हणून हिणवले गेले. तशाच योजना भाजपने आणल्याबद्दल विचारले असता श्री. भंडारी म्हणाले, ‘‘आमच्या योजना रेवडी नाहीत. काँग्रेसच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षाचा योजना चांगल्या असतात, मात्र त्याची अंमलबजावणी कशी होते, ते महत्त्वाचे असते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com