Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंना हवीत सहा मंत्रिपदे;भाजपकडे मागण्यांची यादी सादर,सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू

लोकसभा निवडणुकीनंतर तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे राजकीय वजन वाढले आहे.
Chandrababu Naidu
Chandrababu Naidusakal

नवी दिल्ली/हैदराबाद : लोकसभा निवडणुकीनंतर तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे राजकीय वजन वाढले आहे. आता दोन्ही पक्षांकडून केंद्रात प्रमुख मंत्रालयाची मागणी केली जात असताना टीडीपी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएकडे सहा मोठ्या मंत्रालयाची मागणी केल्याचे म्हटले आहे. तेलगू देसमला लोकसभेचे अध्यक्षपद हवे आहे.

दिल्लीत काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू सामील झाले होते. पक्षाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोदी ३.० सरकारमध्ये टीडीपी महत्त्वाची भूमिका बजावू इच्छित असून आपल्या मागण्याची यादी भाजप नेत्यांना सादर केली आहे. यात लोकसभेचे अध्यक्षपद आणि किमान पाच मंत्रालयाचा समावेश आहे.

यात अर्थमंत्रालय, जलशक्ती मंत्रालय यासारख्या मंत्रालयाचा समावेश असल्याचे समजते. दुसरीकडे नितीशकुमार यांनी तीन मंत्रालय देण्याची मागणी केली आहे. तसेच बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. जेडीयूने चार खासदारांमागे एक मंत्रालय असा फॉर्म्युला सरकारसमोर ठेवला आहे. जेडीयूचे बारा खासदार आहेत आणि म्हणूनच तीन मंत्रालय हवे आहेत. रेल्वे, कृषी आणि अर्थमंत्रालय देण्याबाबत जेडीयू आग्रही आहे. प्रामुख्याने रेल्वे मंत्रालयासाठी अधिक भर दिला जात आहे.

नायडूंचा बारा जूनला शपथविधी शक्य

तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून १२ जून रोजी शपथ घेऊ शकतात. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नायडू हे ९ जून रोजी शपथ घेणार होते. मात्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नसल्याने १२ जूनपर्यंत शपथविधी पुढे ढकलला आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला १३५ जागा मिळाल्या आहेत.

राज्यात १७५ जागा असून बहुमतासाठी ८८ जागा आवश्‍यक आहेत. मात्र टीडीपीने दमदार कामगिरी करत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. तसेच लोकसभेत १६ जागा जिंकल्या आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी अमरावती येथे होऊ शकतो. नायडू हे आंध्राचे चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. १९९५ मध्ये सर्वप्रथम शपथविधी झाला होता. त्यांनी १९९५ पासून २००४ या दोन कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. २०१४ मध्ये आंध्र आणि तेलंगण अशा दोन भागात विभागणी झाली तेव्हा ते तिसऱ्यांदा आंध्राचे मुख्यमंत्री झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com