Dinesh Sharma Interview : ‘वारसा’ विरुद्ध राष्ट्रहिताची महायुती, भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा यांची मुलाखत

लोकसभेसाठी महाराष्ट्रातील काही मतदारसंघांत शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यात राज्यातील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेम मतदानयंत्रात नोंदविले आहे.
Dinesh Sharma Interview
Dinesh Sharma Interview sakal

लोकसभेसाठी महाराष्ट्रातील काही मतदारसंघांत शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यात राज्यातील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेम मतदानयंत्रात नोंदविले आहे. पुढील टप्प्यातही तशीच भाजप व मित्रपक्षांच्या बाजूने ही लाट कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील निवडणूक ही वारसा पुढे नेणाऱ्याविरुद्ध राष्ट्रहिताला बांधील असणारी महायुती अशी आहे. आम्ही विक्रमी जागा जिंकू, असा विश्वास भाजपचे नेते आणि प्रभारी दिनेश शर्मा यांनी व्यक्त केला.

प्रश्नः भाजप महाराष्ट्रातील लोकसभेची लढाई कशी लढतो आहे?

उत्तर : महाराष्ट्रातील लढाई ही अत्यंत वेगळी आहे. देशाला महासत्ता करण्यासाठी प्रतिज्ञारत असलेली आमची युती राष्ट्राचा भविष्यातला प्रवास वेगवान आणि संवेदनशील व्हावा, यासाठी मतदारांना कौल मागते आहे. हा एकप्रकारे प्रगतीची कामे मार्गी लावण्यासाठी मागितलेला आशीर्वाद आहे. दुसरीकडे आमच्या विरोधात उभी असलेली आघाडी मात्र कुटुंबातील हितसंबंध जोपासण्यासाठी मते मागत आहे. मुलीला किंवा मुलाला पुढे आणण्यासाठी राजकारण हा विरोधकांचा उद्देश आहे. या दोन संकल्पनांमध्येच इतका फरक आहे की यात कोण सरस ठरणार हे कमालीचे स्पष्ट आहे.

मोदींच्या व्यक्तिमत्त्वावर भाजप मते मागतो आहे. महाराष्ट्रात तशीच दोन मोठी व्यक्तिमत्त्वे आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे. ही व्यक्तिमत्त्वे भाजपला निवडणुकीत आव्हान देत आहेत. त्यावर आपले मत काय?

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाशी या दोन्ही व्यक्तिमत्वांची तुलनाही होऊ शकत नाही. निवडणुकीत मतदानाला एकत्रितपणे सामोरे गेल्यानंतर केवळ सत्तेसाठी व स्वत: मुख्यमंत्री व्हावे त्यांनी विचारसरणी सोडून तडजोड केली. त्यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाची उंची मोठी आहे. शरद पवारांचे म्हणाल तर एकेकाळी त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच मोठे होते. भाजपसारख्या पक्षाचे भविष्यवेधी राजकारण व मोदी यांच्यासमोर या नेत्यांची लोकप्रियता टिकू शकत नाही.

भाजपची ताकद वाढली आहे, हे मान्य केले तर मग घटक पक्षांची आवश्यकता काय? येथे युती का केली जाते? उद्धव ठाकरे यांची पावले ओळखता आली नाहीत का?

-उद्धव ठाकरे हे श्रध्देय बाळासाहेबांचे पुत्र. त्यांच्या विचारांवर आमची श्रद्धा आणि वारशावरही. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आमच्या समवेत ठेवावे, असे आम्हाला वाटले. आम्ही केवळ जागावाटपासाठी शिवसेनेसमवेत नव्हतो तर नियत व नीती या दोन विशेष समान मुद्द्यांमुळे त्यांच्यासमवेत होतो. ठाकरे यांची नियत बदलेल असे वाटले नव्हते. तसेच प्रभूरामाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेणाऱ्या, रामसेतू या पवित्र वारशाबद्दलचे पुरावे मागणाऱ्या कॉँग्रेससमवेत ते जावून बसतील, याची कल्पना आम्ही कधीही केली नव्हती.

उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपशी द्रोह नव्हे तर जनतेने दिलेल्या कौलाचा विश्वासघात केला. राजकारणातली शुचिता, पावित्र्य ठाकरेंनी हद्दपार केले. आम्ही इतर घटक पक्षांशी युती का करतो? तर विरोधी आघाड्यांचे राजकारण निष्प्रभ करण्यासाठी ते आवश्यक असते हे एक कारण अन दुसरे आमच्या नीतीशी समानधर्मी असणाऱ्या पक्षांसमवेत असणे आम्ही आमचे नैतिक कर्तव्यही मानतो.

महाराष्ट्रात शिवसेना (एकनाथ शिंदे) हा तुमचा समानधर्म पण राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षाचे काय? ते तर यंत्रणांच्या कारवाया टाळण्यासाठी आपल्या समवेत आलेले दिसतात.

-अजित पवार हे आमचे सहकारी आहेत अन् त्यांचा पक्ष आमच्या युतीतला महत्वाचा घटक पक्ष आहे. हे स्पष्ट आहे, अगदी स्वच्छ. दुसरे असे की लालूप्रसाद यांच्यावरील कारवाई असो की के कविता यांच्यावरील. या कॉँग्रेस काळात सुरु झालेल्या चौकशा आहेत. भाजपने कुणावरही दबाव आणायला हे पाऊल उचललेले नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत ही आमची कटिबद्धता आहे. त्यामुळे कुणावरच्या कारवाया थांबवून त्यांना पाठीशी घातलेले नाही. घालणारही नाही.

उत्तरेत रामाच्या नावाने भाजपला मते मिळतील. महाराष्ट्र ही महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. इथे वेगळे विचार श्रद्धेय आहेत.

या महापुरुषांना भाजप कायम वंदन करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मोदी पुढे नेताहेत. उद्धव ठाकरे मात्र त्यांना दोन दोनदा निवडणुकीत हरवणाऱ्या पक्षासमवेत जाऊन बसले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com