Chandrapur Lok Sabha Constituency : मुनगंटीवार-धानोरकर यांच्यात थेट लढत

लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने चंद्रपूर मतदारसंघातून रिंगणात उतरविले. दुसरीकडे पतीच्या निधनानंतर सहज उमेदवारी देईल, अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना संघर्ष करावा लागला.
Chandrapur Lok Sabha Constituency
Chandrapur Lok Sabha Constituencysakal

लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने चंद्रपूर मतदारसंघातून रिंगणात उतरविले. दुसरीकडे पतीच्या निधनानंतर सहज उमेदवारी देईल, अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना संघर्ष करावा लागला. या मतदारसंघात सध्यातरी या दोघांतच काट्याची लढत होणार आहे. मुनगंटीवार यांची प्रतिमा, निवडणूक जिंकण्याचा अनुभव, केलेली विकासकामे ही जमेची बाजू आहे. धानोरकरांना सहानुभूती आणि ओबीसी असण्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मुनगंटीवार आणि धानोरकर या दोघांनाही स्वपक्षातील नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही नाराजी कोण दूर करेल, यावर जयपरायजाचे गणित मांडले जाईल. यावेळी तिसरा उमेदवार तुल्यबळ नसल्याने लढत थेट आहे.

मोदी लाटेतही चंद्रपूरमधून काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले. त्यांच्या अकाली निधनानंतर पोटनिवडणूक झाली नाही. आता त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर रिंगणात उतरल्या आहे. या मतदारसंघात मतविभाजनाचा नेहमीच भाजपला फायदा झालेला आहे. अपवाद फक्त २०१९ ची निवडणूक ठरली. ‘वंचित’च्या उमेदवाराचा भाजपला फटका बसला. भाजपची हक्काची काही मते वंचितकडे वळली. यावेळी ‘वंचित’ने राजेश बेले यांना उमेदवारी दिली आहे. यंदा ‘वंचित’ फॅक्टर फारसा प्रभावी राहणार नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील चार विधानसभेत बाळू धानोरकरांना मताधिक्य होते. ते मताधिक्य कमी करण्याचे आव्हान भाजपसमोर राहणार आहे. या मतदारसंघातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी-आर्णी या विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली होती. तिथे काँग्रेसला काम करावे लागेल. राज्यात मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यानंतर इथल्या ओबीसींनी मोठे आंदोलन उभारले होते. त्याचा फायदा धानोरकरांना होऊ शकतो. मात्र, तिकीट मिळविण्याच्या संघर्षात आमदार प्रतिभा धानोरकर आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे संबंध ताणले गेले.

Chandrapur Lok Sabha Constituency
Ashish Shelar : सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी जागावाटपावर वेळ

अहिर, जोरगेवार, पुगलियांच्या भूमिका महत्त्वाच्या

हंसराज अहिरांनी त्यांच्या पराभवासाठी अनेकदा अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवार यांनाच जबाबदार धरले आहे. त्यामुळे ते मुनगंटीवारांच्या प्रचारात फारसे सक्रीय नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेचा अपवाद वगळता अहीर हे मुनगंटीवार यांच्यासोबत मंचावर दिसले नाही. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांची भूमिकासुद्धा महत्त्वाची असेल. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे. परंतु, जोरगेवार फडणवीस यांच्याजवळचे आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी जोरगेवार हे मुनगंटीवार यांच्यासोबत दिसतील, अशी अनेकांना आशा आहे.

माजी खासदार नरेश पुगलिया यांची भूमिका अद्याप जाहीर नाही. राजुऱ्याचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांचा पूर्वेतिहास बघता ते कुणालाही थेट मदत करणार नाही. परंतु, त्यांचे समर्थक काय करतात, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी रिंगणातील उमेदवार बघता थेट लढत राहणार, हे निश्चित झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष विजयात काय आणि किती योगदान देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com