Thoothukudi Lok Sabha Election Results : DMK च्या कनिमोझींनी थुथुक्कुडी मतदारसंघातून 3,50,390 मतांच्या फरकाने आघाडीवर

कनिमोझी यांना आव्हान देण्यासाठी एआयएडीएमके आणि तमिळ मनिला काँग्रेस (एम) यांनी आपले तगडे उमेदवार उभे केले.
Thoothukudi Lok Sabha Election Results
Thoothukudi Lok Sabha Election Results esakal
Summary

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर काँग्रेस आणि भाजप क्रमांक दोन आणि तीनच्या शर्यतीत होतं.

Thoothukudi Lok Sabha Election Results : द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) खासदार कनिमोझी ह्या 5:35 वाजेपर्यंत तामिळनाडूच्या थुथुक्कुडी मतदारसंघात 3,50,390 मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत, अशी माहिती भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाइटवरुन मिळत आहे. या जागेवर ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) चे उमेदवार आर. शिवासामी वेलुमणी 1,34,385 मतांनी पिछाडीवर आहेत.

मासेमारी व्यवसाय म्हणून संपूर्ण तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेला थुथुकुडी लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये सीमांकनानंतर अस्तित्वात आला. थुथुकुडी लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. द्रमुकच्या कनिमोझी सध्या थुथुकुडी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षानं पुन्हा एकदा कनिमोझी यांना उमेदवारी दिली आहे.

त्याचवेळी कनिमोझी यांना आव्हान देण्यासाठी एआयएडीएमके आणि तमिळ मनिला काँग्रेस (एम) यांनी आपले तगडे उमेदवार उभे केले. कनिमोझी ह्या तामिळनाडूच्या राजकारणातील मोठा चेहरा आहे. अनेक प्रसंगी त्यांनी संपूर्ण तमिळ समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या मंचांवर आवाज उठवला आहे.

Thoothukudi Lok Sabha Election Results
Bengaluru South Election Results : बंगळुरू दक्षिणमधून भाजपच्या तेजस्वी सूर्यांनी घेतली मोठी आघाडी; काँग्रेसच्या सौम्या रेड्डी पिछाडीवर

ट्रेड युनियन नेत्या असण्यासोबतच त्या राज्यसभेच्या खासदारही होत्या. त्यांचे वडील तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी होते. म्हणजेच, त्यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. राजकारणात आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी कनिमोझी सक्रिय पत्रकार होत्या. राजकारणाच्या नंतरच्या काळात कनिमोझी यांचं नाव 2G घोटाळ्यातही आलं, परंतु कनिमोझी यांनी नेहमीच आपल्यावरील आरोप फेटाळले.

कनिमोझींनी 2019 मध्ये द्रमुकची जागा परत मिळवली

थुथुकुडी लोकसभा जागेवर आतापर्यंत तीन वेळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. या तिन्ही निवडणुकांमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात मुख्य लढत झाली आहे. 2009 मध्ये डीएमकेचे खासदार एसआर जयदुराई 3 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते, तर 2014 मध्ये एआयएडीएमकेचे जे. जयसिंग थियागराजा नैतर्जी विजयी झाले, तर DMK 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा विजयी झाले. पक्षाच्या खासदार कनिमोझी 5.63 लाखांच्या बंपर मतांनी विजयी झाल्या. या जागेवर आतापर्यंतच्या मतांचा हा विक्रम होता.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर काँग्रेस आणि भाजप क्रमांक दोन आणि तीनच्या शर्यतीत होतं. 2009 मध्ये जेव्हा DMK खासदार एसआर जयदुराई यांनी 3 लाखांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकली, तेव्हा AIADMK दुसरा पक्ष म्हणून उदयास आला तर भाजप चौथा पक्ष म्हणून उदयास आला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत AIADMK खासदार जे. जयसिंग त्यागराज यांनी 3.66 लाख मतांनी विजय मिळवला. यंदा द्रमुकचे उमेदवार पी. जेगन सुमारे 2.4 लाख मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु, 2019 च्या निवडणुकीत DMK खासदार कनिमोझी यांनी 56.77 टक्के मतांसह पक्षासाठी गमावलेली जागा पुन्हा मिळवली. विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप दुसरा पक्ष म्हणून समोर आला होता. या जागेवरील आलेख सातत्यानं वाढत असल्यानं भाजपमध्ये उत्साह आहे. यावेळी पक्षानं एका करारानुसार टीएमसी (एम) सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळं येथून कनिमोझी यांना केवळ एआयएडीएमकेकडूनच नव्हे तर टीएमसी (एम) कडूनही चुरशीचा सामना करावा लागला. तर, एआयएडीएमकेनं आर शिवसामी वेलुमणी यांना उमेदवारी दिली.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, काँग्रेस, VCK, MDMK, CPI, CPI(M), IUML, MMK, KMDK, TVK आणि AIFB यांचा समावेश असलेल्या DMK-नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीने 39 पैकी 38 जागा जिंकून जबरदस्त विजय नोंदवला. 2019 मध्ये, DMK ने 33.2 टक्के मतांसह 23 लोकसभेच्या जागा जिंकल्या, काँग्रेसने 12.9 टक्के मतांसह 8 जागा जिंकल्या आणि तामिळनाडूमध्ये सीपीआयने दोन जागा जिंकल्या.

थुथुकुडी लोकसभेचं जातीय समीकरण

थुथुकुडी लोकसभा मतदारसंघ पूर्णपणे थुथुकुडी जिल्ह्यांतर्गत येतो. 2011 च्या जनगणनेनुसार, थुथुकुडीचा साक्षरता दर 77.12 टक्के आहे. मागील जनगणनेनुसार, थुथुकुडीमध्ये अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या सुमारे 19.7 टक्के होती. कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघानंतर थुथुकुडी हा दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे, जिथं ख्रिश्चन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. येथील ख्रिश्चन मतदार 16.68 टक्के आहेत. तर, मुस्लिमांची लोकसंख्या 4.61 टक्के आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, थुथुकुडीमध्ये ग्रामीण मतदारांची संख्या 48.7 टक्के आहे, तर शहरी मतदारांची संख्या 51.3 टक्के आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथील मतदार यादीत 14,25,401 मतदारांची नावं होती. थुथुकुडी लोकसभेसाठी एकूण 1618 केंद्रांवर 69 टक्के मतदान झालं.

थुथुकुडी लोकसभा मतदारसंघाची काय ओळख?

थुथुकुडीला राज्यात पर्ल सिटी असंही म्हणतात. याला तामिळनाडूचं सागरी प्रवेशद्वारही संबोधलं जातं. थुथुकुडी किनाऱ्यावर मासळीची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मत्स्य व्यवसाय हा येथील रहिवाशांचा पारंपरिक व्यवसाय आहे. थुथुकुडी हे वर्षानुवर्षे सागरी व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र आहे. मासळीशिवाय हे शहर मिठाच्या व्यवसायासाठी ओळखलं जातं. शहराच्या आजूबाजूच्या भागात मीठ तयार केलं जातं. इथून मीठ तामिळनाडूसह देशाच्या अनेक भागात पुरवलं जातं. म्हणजे, मीठ आणि मासे हा इथल्या व्यवसायाचा आणि अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com