S. Jaishankar : मोदींविरोधी प्रचाराचा परकी संस्थांचा प्रयत्न ; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा आरोप,मुंबईत विविध माध्यमांच्या संपादकांशी संवाद

‘‘या निवडणुकीत डिजिटल मीडियाचा वापर करून आंतरराष्ट्रीय संस्था मोदीविरोधी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आधीच्या निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीने विरोधी विचारधारेचा प्रचार करण्यात आला होता.
S. Jaishankar
S. Jaishankarsakal

मुंबई : ‘‘या निवडणुकीत डिजिटल मीडियाचा वापर करून आंतरराष्ट्रीय संस्था मोदीविरोधी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आधीच्या निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीने विरोधी विचारधारेचा प्रचार करण्यात आला होता. ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होणार नाहीत,’’ असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज केले.

मुंबईतील विविध माध्यमांच्या वरिष्ठ संपादकांशी जयशंकर यांनी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘आधीच्या निवडणुकांमध्येही विरोधी विचारधारेचा प्रचार करण्यात आला होता. मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही देशांच्या विशिष्ट विचारधारेच्या मानसिकतेमुळे अशा पद्धतीचा प्रचार करण्यात येत आहे. ते त्यांच्या या प्रयत्नात यशस्वी होतील, असे वाटत नाही,’’असे जयशंकर म्हणाले.

भारतातील निवडणुका, युरोपीय देशांसोबत असलेले भारताचे संबंध, पीओके अशा विविध विषयांवर यावेळी एस.जयशंकर यांनी देशाच्या आगामी काळातील भूमिकेवर भाष्य केले. ‘नाम’ चळवळीचे जागतिक स्थान कमकुवत झाले असून अलिप्ततावादी चळवळही प्रभावहीन झाली आहे. तरीही भारत या चळवळीत आपले स्थान राखून आहे, असे सांगताना येत्या पाच वर्षांत जागतिक राजकारणात आणि सामरिक स्थितीत मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यताही जयशंकर यांनी बोलून दाखवली.

S. Jaishankar
Amit Shah : ‘त्यांना’ मतपेढीची भीती,अमित शहा ; धुळ्यातील सभेत उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यावर आरोप

कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंह निज्जर हत्याप्रकरणात चौकशी करावी, असा कोणताही महत्त्वाचा तपशील अद्याप भारत सरकारला पाठवला गेलेला नाही. मात्र तेथील तपासयंत्रणांनी सहकार्याचे आवाहन केले तर मदत करण्यास तयार असल्याचे डॉ. जयशंकर यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप नेते शायना एन सी आणि केशव उपाध्ये या वेळी मंचावर होते.

या हत्येसंबंधी जी माहिती मिळते आहे ती आम्ही समजून घेतो आहोत. भारतीय वंशाच्या व्यक्तींचा या घटनेत असलेल्या कथित सहभागाची माहिती दुतावासाकडून मिळते. अशी माहिती पाठवणे हा राजनैतिक प्रक्रियेचा भाग असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त झाली आहे, असेही ते म्हणाले. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चीनने भूभाग बळकावला नाही

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने सर्व पातळ्यांवर प्रगती केली आहे. त्यामुळे देशहितासाठी जनता मोदी यांना तसेच भारतीय जनता पक्षाला पाठबळ देईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज येथे व्यक्त केला. चीनने आपला कोणताही भूभाग आता बळकावला नाही, असेही ते म्हणाले. बीकेसीच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की मोदींच्या राजवटीत आपला कोणताही भूभाग चीनने बळकावला नाही. उलट १९५८ आणि १९६२ मध्ये चीनने भारताचा पेगाँग सो, लदाक ब्रिज हा भूभाग बळकावला आहे.

शक्सगाम व्हॅली ही माजी पंतप्रधान नेहरू यांच्यामुळेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली व तोच भाग त्यांनी चीनला देऊन टाकला. अरुणाचलच्या यांगत्से मधून आम्हीच चीनची हकालपट्टी केली. तरीही, हमारे जवानों की पिटाई हुई, असे काँग्रेस नेते राहुल गांधी खोटे बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुरामन राजन तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, आपण उत्पादन करू शकत नाही. मात्र आता देशात सरकारी आणि खासगी गुंतवणूक होत असून चार जूननंतर परदेशी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com