Hatkanangale Constituency Lok Sabha Election Result
Hatkanangale Constituency Lok Sabha Election Result esakal

Hatkanangale Constituency Lok Sabha Election Result: आबांचा खेळ शेट्टींनी बिघडवला! हातकणंगलेत धैर्यशील मानेच खासदार

Dhairyasheel Mane Won Hatkanangale Lok Sabha Election : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना धैर्यशील माने विजयी झाले होते. त्यांना ५,७४,०७७ मते मिळाली होती. तर राजू शेट्टी यांनी ४,८०,२९२ मते मिळाली होती.
Published on

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. धैर्यशील माने १३४२६ मतांनी विजय झाले आहेत. तीन महत्वाचे उमेदवार हातकणंगलेत मैदानात होते. धैर्यशील माने यांना ५ लाख २० हजार १९० मते मिळाली. तर सत्यजीत आबा सरुडकर यांना ५ लाख ०६ हजार ७६४ मते मिळाली. राजू शेट्टी यांना १ लाख ७९ हजार ८५० मिळाली. शेट्टी यांचा ३ लाख ४० हजार ३४० मतांनी पराभव झाला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेना शिंदे गटाते धैर्यशील माने तर उद्धव ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील-सरुडकर हे प्रमुख उमेदवार निवडणुकीत प्रतिस्पर्धी होते.हातकणंगले हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला होता.

Hatkanangale Constituency Lok Sabha Election Result
Maharashtra Lok Sabha Election Results: राज्यात भाजपचा धुव्वा तर काँग्रेसची लाट, वाचा लोकसभा निवकालाची प्रत्येक अपडेटट

हातकणंगले हे महत्त्वाचे कृषी क्षेत्र आहे. उद्योगासाठीही हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. साखर, कापड आणि रासायनिक उद्योग येथे प्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत मतदारसंघात शेट्टी यांच्या प्रचारार्थ सभा गाजविल्या होत्या. आता मात्र ते मोदींच्या विरोधकांच्या भूमिकेत आहेत.

विधानसभेत कुणाचे वर्चस्व -

या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी व शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शाहूवाडीत जनसुराज्यचे विनय कोरे, हातकणंगलेत कॉँग्रेसचे राजू आवळे, इचलकरंजीत प्रकाश आवाडे (अपक्ष), शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष), इस्लामपूरमध्ये जयंत पाटील (राष्ट्रवादी), शिराळ्यात मानसिंग नाईक (राष्ट्रवादी) हे आमदार आहेत.

२०१९ मध्ये काय परिस्थिती होती?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना धैर्यशील माने विजयी झाले होते. त्यांना ५,७४,०७७ मते मिळाली होती. तर राजू शेट्टी यांनी ४,८०,२९२ मते मिळाली होती. गेल्यावेळी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी गेम चेंजर ठरली होती. वंचितच्या अस्लम सय्यद यांना १,२०,५८४ मते मिळाली होती. अपक्ष असलेले संग्राम गायकवाड यांना ८,६९५ मताधिक्य मिळाले होते. धैर्यशील माने यांचा ९६,०३९ मतांनी विजय झाला होता.

Hatkanangale Lok sabha Election
Hatkanangale Lok sabha Election

२०२४ ला किती मतदान झालं?

हातकणंगलेमध्ये १.३२ टक्क्यांची वाढ आहे. शिरोळमध्ये १.६०, तर इस्लामपूरमध्ये ३.४३ टक्के वाढ आहे. हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत वाढली. हातकणंगले लोकसभेच ७१.११ टक्के मतदान झाले. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७५.३२ तर शाहूवाडी, शिरोळ मतदारसंघांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत २०१९ च्या तुलनेत एक टक्‍क्याने मतदान वाढले आहे.

Hatkanangale Constituency Lok Sabha Election Result
India Lok Sabha Election Results : 300च्या आधी थांबली NDAची गाडी, PM मोदींनी जनतेचे मानले आभार, काँग्रेस म्हणाली- मोदींच्या विरोधात जनादेश

निवडणुकीत कोणते मुद्दे गाजले -

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलन मुद्दा चांगलाच गाजला. इचलकरंजीचा पाणी प्रश्न कळीचा मुद्दा होता, अजूनही हा प्रश्न सुटला नाही. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधाचा मुद्दा प्रचारात गाजला. रत्नागिरी-नागपूर महामार्गात अखेरच्या टप्प्यातील चौपट भरपाईचा मुद्दा, ऊस दराचे आंदोलन, यंत्रमाग व्यवसायातील चढ-उतार, महापूरप्रश्नी धोके आणि उपाय योजना, प्रलंबित, ड्रायपोर्ट प्रकल्प, शिराळा शाहूवाडी पन्हाळा रोजगाराचा प्रश्न, तीर्थक्षेत्र विकासाचा प्रश्न, असे अनेक मुद्दे या निवडणुकीत चर्चेत आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com