‘बाबाजी फॅक्टर’मुळे ‘कांटे की टक्कर’

लोकसभेच्या नाशिक मतदार संघामध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर मैदानावर ‘वन साईड मॅच’ चालू होती.
jai babaji janardan swami shantigiri maharaj nashik lok sabha election politics
jai babaji janardan swami shantigiri maharaj nashik lok sabha election politicssakal

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामध्ये शेवटच्या दोन दिवसांत बाबाजी फॅक्टरला महत्त्व आले आहे. त्यामुळे सरळ-सरळ दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी झाली आहे. त्याला कारण म्हणजे शेवटच्या दोन दिवसांत जय बाबाजी परिवाराचे व जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांचे महत्त्व वाढले. त्यामुळे या तिरंगी लढतीत बाबाजी फॅक्टरच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. बाबाजी फॅक्टर जोर धरत असताना महायुतीची धडधड वाढली आहे.

- विक्रांत मते

लोकसभेच्या नाशिक मतदार संघामध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर मैदानावर ‘वन साईड मॅच’ चालू होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली व त्या पाठोपाठ जय बाबाजी परिवाराचे शांतिगिरी महाराज यांनीही लोकसभेचे मैदान लढविण्याचा निर्णय घेतला.

महायुतीचा उमेदवार अगदी ऐनवेळी जाहीर झाला. खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच आहे. सुरुवातीच्या काळात महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ४५ दिवस प्रचाराला अधिक वेळ मिळाला. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीचे पारडे जड ठरले.

उमेदवारी अर्ज माघारीनंतर चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. कागदावर चौरंगी लढत दिसत असली तरी खरी लढत दुरंगीच आहे. मात्र मतदानाच्या दोन दिवस अगोदर बाबाजी फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे.

वेळ कमी मिळाल्याने महायुतीचे नियोजन काही प्रमाणात ढासळले.महाविकास आघाडीला प्रचारासाठी अधिक दिवस मिळाल्याने त्यांच्या नियोजनात कसर राहिली नाही. मात्र महायुतीचे पदाधिकारी चाचपडत राहिले.

महायुतीचे आमदार शहरातील साडेतीन विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघांमध्ये भाजप व मनसेचे तळागाळापर्यंत कार्यकर्ते असल्याने ते किती मनाने काम करतात यावर महायुतीच्या विजयाचे गणित अवलंबून राहील.

मतदानाच्या पूर्वसंध्येला मोदी फॅक्टर अधिक चर्चेला आणला गेल्याने महायुतीला त्याचा फायदा होईल. भाजपचा स्लीपर व्होटर किती प्रमाणात बाहेर पडेल यावर महायुतीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. बाबाजी फॅक्टर अधिक प्रमाणात चालल्यास महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला त्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. तूर्त सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये आता ‘कांटे की टक्कर’ सुरू झाली आहे.

शांतिगिरी यांच्या दाव्याने खळबळ

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शांतिगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना हिंदुत्ववादी संघटनांकडून आपल्याला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. भाजपचादेखील पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्ष त्यांनी सांगितल्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ आली. त्यामुळे अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com