Jalna Loksabha Result : साबळेंचा ‘फुलटॉस’ दानवेंची विकेट!

लोकसभेच्या जालना मतदारसंघात पंचवीस वर्षांपासून खासदार असलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस) यांनी पराभव केला. दानवे यांच्या पराभवाचे कारण ठरले ते मराठा चेहरा म्हणून अपक्ष उभे राहिलेले मंगेश साबळे. मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेचा फटका दानवे यांना बसला.
Jalna Loksabha Result
Jalna Loksabha Resultsakal

लोकसभेच्या जालना मतदारसंघात पंचवीस वर्षांपासून खासदार असलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस) यांनी पराभव केला. दानवे यांच्या पराभवाचे कारण ठरले ते मराठा चेहरा म्हणून अपक्ष उभे राहिलेले मंगेश साबळे. मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेचा फटका दानवे यांना बसला. त्यामुळे महायुती-महाविकास आघाडीच्या या दुरंगी लढतीमध्ये एक लाख ५५ हजार ९३० मते घेणाऱ्या मंगेश साबळे यांच्या फुलटॉसने दानवेंची विकेट घेतली, अशीच चर्चा आता होत आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे गेली पंचवीस वर्षांपासून जालना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे भाजपकडून सहाव्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली होती. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत एकही सभा न घेणाऱ्या दानवेंनी या निवडणुकीत प्रचार सभा, बैठका घेऊन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.

शिवाय महायुतीमधील शिंदे गट शिवेसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नाराजीचा सूर अधूनमधून निघत होता. त्यामुळे एक वेळा नाही, तर तीन वेळा खोतकर यांची भेट देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही दानवे यांनी केला. दुसरीकडे मराठा आरक्षण मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे आणि राज्य शासन यांच्यात दानवे यांनी मध्यस्ती केली होती. मात्र, त्यानंतर जरांगे यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका या सर्व बाबींमुळे दानवे लोकसभेत बॅकफूटवर गेले, असे बोलले जात आहे.

काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे या निवडणुकीत दुसऱ्या मतमोजणीच्या फेरीपासून आघाडीवर राहिले. विशेष म्हणजे काळे, दानवे आणि साबळे हे तिन्ही उमेदवार मराठा असल्याने मराठा मतांचे मोठे विभाजन झाले. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मंगेश साबळे यांनी अनपेक्षित एक लाख ५५ हजार ९३० मते मिळवली.

यातील ९० टक्के मते ही भाजपची होती, असा तर्क आहे. सहाही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे काळे यांना लीड मिळाली. विशेष म्हणजे विधानसभेच्या भोकरदन, बदनापूर आणि जालना मतदारसंघातून दानवे यांना लीड मिळाली नाही.

मराठा आरक्षणामुळे मराठा मतदार, ओबीसी मतांचे झालेले विभाजन, पक्षातील आणि मित्रपक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची सुप्त नाराजी अन् मंगेश साबळे यांनी अपक्ष उमेदवारीचा टाकलेला फुलटॉस यामुळे दानवेंना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेल्या कामामुळे डॉ. काळे यांचा विजय सुकर झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com