मंत्र्यांच्या मुलांना काँग्रेसकडून तिकीट; बेळगावमधून मृणाल हेब्बाळकर, तर चिक्कोडीतून प्रियंका जारकीहोळींना उमेदवारी

काँग्रेसने (Congress) जाहीर केलेली ही तिसरी आणि प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी आहे.
Karnataka Loksabha Elections Mrinal Hebbalkar Priyanka Jarkiholi
Karnataka Loksabha Elections Mrinal Hebbalkar Priyanka Jarkiholiesakal
Summary

काँग्रेसने कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगण, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Karnataka Loksabha Elections) प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण १७ मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका जारकीहोळी (Priyanka Jarkiholi) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अद्याप चार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत. सौम्या रेड्डी बंगळूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राजीव गौडा बंगळूर उत्तरमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने (Congress) जाहीर केलेली ही तिसरी आणि प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी आहे. काँग्रेसने आतापर्यंत एकूण ५७ नावांची घोषणा केली आहे.

Karnataka Loksabha Elections Mrinal Hebbalkar Priyanka Jarkiholi
महाराष्ट्र लुबाडला जाताना दाढीवाले मिंधे दिल्लीची चाकरी करतायत, त्यांचे बूट चाटताहेत; ठाकरेंचा घणाघाती हल्ला

कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगण, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ईश्वर खांड्रे यांचा मुलगा २६ वर्षीय सागर खांड्रे यांना बिदर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अशा प्रकारे ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील सर्वांत तरुण उमेदवारांपैकी एक आहेत. म्हैसूर मतदारसंघात काँग्रेसचे एम. लक्ष्मण हे भाजपचे यदुवीर वडियार यांच्याविरुद्ध लढणार आहेत.

Karnataka Loksabha Elections Mrinal Hebbalkar Priyanka Jarkiholi
Kolhapur Loksabha : तब्बल 25 वर्षांनंतर कोल्हापुरात दिसणार 'हात'; शाहू महाराजांच्या उमेदवारीने मिळाली प्रतिष्ठा

मतदारसंघ व उमेदवार असे

  • १. चिक्कोडी प्रियंका जारकीहोळी

  • २. बेळगाव मृणाल हेब्बाळकर

  • ३. बागलकोट संयुक्ता पाटील

  • ४. गुलबर्गा डॉ. राधाकृष्ण दोड्डमणी

  • ५. रायचूर कुमार नाईक

  • ६. बिदर सागर खांड्रे

  • ७. कोप्पळ राजशेखर हिटनाळ

  • ८. धारवाड विनोद आसुटी

  • ९. दावणगेरे प्रभावती मल्लिकार्जुन

  • १०. उडुपी-चिक्कमगळूर जयप्रकाश हेगडे

  • ११. मंगळूर पद्मराज

  • १२. म्हैसूर-कोडगू एम. लक्ष्मण

  • १३. बंगळूर उत्तर प्रा. राजीव गौडा

  • १४. बंगळूर मध्य मन्सूर खान

  • १५. बंगळूर दक्षिण सौम्या रेड्डी

  • १६. चित्रदुर्ग बी. एन. चंद्राप्पा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com