'..म्हणून त्यांनी राजघराण्यातील राजकीय बळी द्यायलाही मागेपुढे पाहिले नाही'; मुश्रीफांची सतेज पाटलांवर टीका

राजर्षी शाहू महाराज सर्वांचेच दैवत असून कोणा एकट्याचे नाहीत.
Kolhapur Lok Sabha Elections Hasan Mushrif
Kolhapur Lok Sabha Elections Hasan Mushrifesakal
Summary

शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे पुरोगामित्व आमच्या डीएनएमध्येच असून या महामानवांचे विचार कृतीतून उतरवण्याचे काम मंडलिक घराण्याने केले आहे.

बिद्री : ‘मीच जिल्ह्याचा सम्राट अशा अविर्भावात वावरणाऱ्या एका शक्तीने स्वतःला लोकसभा निवडणूक लढवायला लागू नये म्हणून राजघराण्यातील राजकीय बळी द्यायला मागेपुढे पाहिले नाही. अशा पडद्याआडून लढणाऱ्या स्वयंघोषित सम्राटांना सूज्ञ मतदारच महायुतीच्या प्रा. संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य देऊन धडा शिकवतील’, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर नाव न घेता केली.

कागल तालुक्यातील बिद्री-बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी (Ajit Pawar Group) पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे होते. या मेळाव्याला परिसरातील मुश्रीफ-मंडलिक समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Kolhapur Lok Sabha Elections Hasan Mushrif
Sangli Lok Sabha : विशाल काय करणार? चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर नवा 'ट्रेंड'

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘या निवडणुकीत कोणा व्यक्तीविरोधात आपली लढाई नसून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई आहे. शंभर वर्षांपूर्वी राजर्षींनी केलेले काम हे माझेच आहे, असे सांगण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. राजर्षी शाहू महाराज सर्वांचेच दैवत असून कोणा एकट्याचे नाहीत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे पुरोगामित्व आमच्या डीएनएमध्येच असून या महामानवांचे विचार कृतीतून उतरवण्याचे काम मंडलिक घराण्याने केले आहे. काही जणांचे डमी उमेदवार म्हणून शाहू महाराजांना निवडणूक लढवायला भाग पाडणाऱ्यांचा या निवडणुकीत निश्चितच पर्दाफाश होणार आहे.’

Kolhapur Lok Sabha Elections Hasan Mushrif
Sangli Lok Sabha : 'सांगली'च्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये संताप उसळला; विशाल पाटील बंडाच्या पवित्र्यात!

माजी जि. प. सदस्य मनोज फराकटे म्हणाले, ‘देशाच्या आर्थिक प्रगतीची दृष्टी असणाऱ्या नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा विजय गरजेचा आहे. या निवडणुकीत बिद्री-बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रा. संजय मंडलिक यांना मिळणारे मताधिक्य हे अन्य मतदारसंघापेक्षा सर्वाधिक असेल.’

Kolhapur Lok Sabha Elections Hasan Mushrif
Kolhapur Lok Sabha : इंदिराजींची साथ शंकरराव मानेंना नडली अन् दिल्लीत त्यांची उमेदवारी कापली, असं नेमकं काय घडलं?

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, बिद्रीचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, दिनकर कोतेकर, अण्णासाहेब पोवार, बाळासाहेब फराकटे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, विकास पाटील, पांडुरंग तात्या पाटील, सूर्यकांत पाटील, रघुनाथ कुंभार, आनंदराव फराकटे, मसु पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, सुभाष भोसले आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत अशोक कांबळे यांनी केले. आभार केंबळीचे सरपंच विकास पाटील यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com