Hatkanangale Result : धैर्यशील माने मंत्रिपदाच्या शर्यतीत; पश्‍चिम महाराष्ट्रातील शिंदे गटाचा एकमेव विजय

काल झालेल्या निकालात पश्‍चिम महाराष्ट्रात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा धुव्वा उडाला.
Hatkanangale MP Dhairyasheel Mane
Hatkanangale MP Dhairyasheel Maneesakal
Summary

महायुतीत भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र होते.

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाल्याने देशात एनडीएची सत्ता पुन्हा आल्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Hatkanangale MP Dhairyasheel Mane) यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा त्यांनी मिळवलेला विजय, पश्‍चिम महाराष्ट्रात शिंदे गटाचे एकमेव खासदार, चांगले भाषण कौशल्य, विषयांची जाण या जोरावर ते मंत्रिपदाचे दावेदार होऊ शकतात.

महायुतीत भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र होते. या महायुतीला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. भाजपने २८, शिंदे गटाने १५ तर राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या. ‘रासप’ ला बुलढाण्याची जागा देऊन त्याठिकाणी जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती; पण त्यांचा पराभव झाला.

Hatkanangale MP Dhairyasheel Mane
Kolhapur Lok Sabha Results : बालेकिल्ल्यांनी केला मंडलिकांचा घात; शाहू महाराजांना जिंकवत सतेज पाटील ठरले 'किंगमेकर'

काल झालेल्या निकालात पश्‍चिम महाराष्ट्रात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा धुव्वा उडाला. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक हेही पराभूत झाले. शिंदे गटाला राज्यात केवळ सात जागांवर विजय मिळवता आला. त्यात शिंदे यांचे पुत्र श्रीकांत, ठाण्यात नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, संदीपान भुमरे, हातकणंगलेतून धैर्यशील माने, मावळमध्ये श्रीरंग बारणे व बुलाढाण्यातून प्रताप जाधव विजयी झाले आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान द्यायचे झाल्यास शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत, अनुभवी श्री. वायकर, दुसऱ्यांदा विजयी झालेले बारणे यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो; पण पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षवाढीचा विचार डोळ्यापुढे ठेवून मंत्रिपद द्यायचे झाल्यास माने हे एकमेव उमेदवार आहेत. त्यात शिंदे यांनी त्यांच्यासाठी मोठ्या जोडण्या मतदारसंघात लावल्या होत्या. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशीही त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. स्वतः शिंदे मुख्यमंत्री असल्याने पुन्हा मुलाला केंद्रात मंत्रिपद मिळेल का याची शाश्‍वती नाही. त्यातून माने यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com