Polling Station : जिओ सेन्सिंगद्वारे शोधा आपले मतदान केंद्र

मतदारांना आपले मतदान केंद्र सहजरित्या शोधण्यासाठी व तेथे पोहचण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोजन केंद्र पुणेच्या (एमआरएसएसी) साहाय्याने विकसित ‘पी.एस. जिओ पोर्टल’ मतदारांसाठी उपयुक्त ठरत आहे.
Polling Station
Polling Stationsakal

पुणे : मतदारांना आपले मतदान केंद्र सहजरित्या शोधण्यासाठी व तेथे पोहचण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोजन केंद्र पुणेच्या (एमआरएसएसी) साहाय्याने विकसित ‘पी.एस. जिओ पोर्टल’ मतदारांसाठी उपयुक्त ठरत आहे. मतदारांनी आपल्या मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा आणि मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

या पोर्टलमध्ये शिरूर, मावळ व पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संगणकावर क्यूआर कोड स्कॅन करावा.

या पोर्टलवर मतदारास आपला विधानसभा मतदारसंघ व त्यातील मतदान केंद्राचे नाव किंवा क्रमांक वापरून त्याचे अचूक भौगोलिक स्थान नकाशावर आपल्यासमोर दिसेल व दिसलेल्या ठिकाणी क्लिक केल्यास आपल्याला मतदान केंद्राची माहिती मिळेल, अशी माहिती एमआरएसएसी, पुणेचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिली.

मतदान केंद्रापर्यंत कसे पोहचाल

‘पी.एस. जिओ पोर्टल’ची लिंक क्लिक केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्राचे नाव निवडावे. मतदान केंद्रावर क्लिक केल्यानंतर मॅपवर निळ्या रंगाचे मतदान केंद्राचे लोकेशन दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूस मतदान केंद्राचा तपशील येईल. त्यातील ‘डायरेक्शन’ समोरील व्ह्यू या शब्दाला क्लिक केल्यावर गुगल मॅपवर मतदान केंद्र शोधता येईल. पोर्टलची लिंक क्युआरकोडद्वारेही ओपन करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com