Loksabha election voting : 'या' सहा जिल्ह्यांमध्ये 0 टक्के मतदान; भाजपची सत्ता असूनही...

नागालँडमधील एका लोकसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येथे ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय.
Loksabha election voting : 'या' सहा जिल्ह्यांमध्ये 0 टक्के मतदान; भाजपची सत्ता असूनही...

Nagaland Voting : नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षाची सत्ता आहे. असं असूनही नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये शुन्य टक्के मतदान झालं आहे. नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूक मतदान प्रक्रियेचा खोळंबा झाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांवर मतदार फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे जवळपास शून्य टक्के मतदान झाले आहे. शेवटच्या दोन तासांमध्ये काय होतं, हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे.

नागालँडमधील एका लोकसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येथे ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय.

Loksabha election voting : 'या' सहा जिल्ह्यांमध्ये 0 टक्के मतदान; भाजपची सत्ता असूनही...
Chhagan Bhujbal : नाशिकमधून छगन भुजबळ यांची माघार; पत्रकार परिषद घेत सांगितलं कारण

केंद्र सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याने मतदारांमध्ये निरुत्साह आहे. नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत. पैकी २० मतदारसंघांमध्ये मतदारांनी बहिष्कार टाकलेला आहे. याचा परिणाम सहा जिल्ह्यांमध्ये दिसून येतोय. निवडणूक आयोगाने संघटनेला याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मतदान हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याचं आणि मतदारांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तसं आवाहन केल्याचं संघटनेने म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com