Rahul Gandhi : महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये मिळणार, युवकांसाठीही योजना; राहुल गांधींची सोलापूरमध्ये घोषणा

''महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांची यादी बनवली जाईल. यामध्ये सगळ्या जाती, धर्मातील महिलांच्या प्रत्येक कुटुंबातील एका महिलेचा समावेश केला जाईल. शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक.. कोट्यवधी महिलांना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देईल.''
Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्ष आणि उमेदवारांकडून जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. त्यातच बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोलापूरमध्ये होते. आयोजित प्रचारसभेमध्ये त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच महिला आणि युवकांसाठी थेट रक्कम देणारी योजना जाहीर केली.

राहुल गांधी म्हणाले की, जेवढा जीएसटी तुम्ही भरता तेवढाच अदानीदेखील भरतात. तरीही सरकारकडून त्यांना अधिकची मुभा दिली जाते. देशामध्ये १ टक्के लोकांकडे ४० टक्के मालमत्ता आहे. भाजप सरकारने देशात २०-२५ अरबपती बनवले आहेत. मात्र आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत.

नेमकं राहुल गांधी काय म्हणाले?

योजनेची घोषणा करताना राहुल गांधी म्हणाले की, सध्याच्या घडीला स्त्री-पुरुष दोघेही जॉब करतात. स्त्रीया घरचं सगळं काम करुन, मुलांचं सगळं बघून कामाला जातात. त्यासाठी त्या वेगळा मोबदला मागत नाहीत. त्यामुळे आम्ही स्त्रीयांसाठी महालक्ष्मी योजना आणणार आहोत.

महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांची यादी बनवली जाईल. यामध्ये सगळ्या जाती, धर्मातील महिलांच्या प्रत्येक कुटुंबातील एका महिलेचा समावेश केला जाईल. शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक.. कोट्यवधी महिलांना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देईल. महिन्याला ८ हजार ५०० रुपये मिळतील, अशी घोषणा राहुल गांधींनी केली.

Rahul Gandhi
Nitin Gadkari Video : नितीन गडकरींना यापूर्वी चारवेळा आली होती भोवळ; नेमका त्रास काय?

युवकांना काय मिळणार?

यावेळी राहुल गांधींनी बेरोजगार आणि शिक्षित युवकांसाठी एका योजनेची घोषणा केली. ते म्हणाले की, मोदींनी आम्हाला बेरोजगार केलेलं आहे, हिंदुस्थानचं धन अदानीला दिलं, १५ लाखांचा जुमला केला, कोविडमध्ये थाळ्या वाजवल्या. त्यामुळे देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे.

देशामध्ये कुणीही ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर असेल त्याला अप्रेंटिशिप मिळेल. लाभार्थ्याला सरकारकडे ते मागण्याचा अधिकार असेल. त्यातून युवकांना पहिल्या वर्षी एक लाख रुपये बँकेच्या अकाऊंटमध्ये येतील. या योजनेत युवकांना नोकऱ्यासुद्धा देण्यात येणार आहेत. पब्लिक सेक्टर, सरकारी कंपन्या, खासगी कंपन्यांमध्ये जॉब दिले जातील. अशी ग्वाही राहुल गांधींनी सोलापूरमध्ये दिली.

Rahul Gandhi
Pune News : मुस्लीम समाजाबाबत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य दुर्दैवी आणि खेदजनक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com