Lok sabha nivadnuk nikal 2024 : काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर; इंडिया आघाडी अनपेक्षित यशाकडे

Lok sabha nivadnuk nikal 2024 : काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर; इंडिया आघाडी अनपेक्षित यशाकडे
Updated on

Lok sabha election result live updates : इंडिया आघाडीच्या बाबतीत व्यक्त केलेले सगळे अंदाज आणि एक्झिट पोल फोल ठरण्याच्या शक्यता आहे. कारण सकळी साडेनऊ वाजता इंडिया आघाडी २२८ जागांवर आघाडीवर आहे. शिवाय जो काँग्रेस पक्ष मागच्या दहा वर्षांपासून दोन आकड्यांवर आणि तेही पन्नासच्या आतबाहेर होता. तोच पक्ष आता तीन अंकी आकडे गाठू लागला आहे.

सकाळी साडेनऊ वाजता हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस ११६ जागांवर आघाडीवर असून एनडीए २६१ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने २३४ जागांवर आघाडीवर घेतली आहे. एक्झिट पोलमध्ये भापज साडेतीनशे जागांच्या वर यश मिळवेल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे. सायंकाळपर्यंत पुन्हा मोठे बदल होऊ शकतात.

दहा वर्षांचा वनवास संपला?

२००९ मध्ये काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या तर भाजप ११६ जागा जिंकू शकलं होतं. २०१४ मध्ये मोदी पर्वाचा उदय झाल्यानंतर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने २८२ जागांवर विजय मिळवला होता.

२०१९ मध्ये भाजपने ३०३ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेस ५२ जागांवर अडकून पडलं होतं. मात्र यावेळी काँग्रेसने तीन आकडे पार करत ११२ जागांवर आघाडी घेतली आहे. संध्याकाळपर्यंत नेमके आकडे हाती येतील.

लोकसभेचा रणसंग्राम

🔴मोदी करणार हॅट्रिक की राहुल गांधी देणार धक्का ? देशभरातल्या मतदारसंघांचे क्षणाक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या LIVE

https://www.esakal.com/lok-sabha-election/lok-sabha-election-results-live-updates-2024-general-elections-winners-list-in-indian-constituencies-all-state-nivadnuk-outcome-for-india-congress-vs-nda-bjp-modi-vs-gandhi-all-in-marathi-news-kgm00

🟣मविआ मारणार बाजी की महायुती गड राखणार ? जाणून घ्या महाराष्ट्राचा महानिकाल LIVE

https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-lok-sabha-election-results-live-updates-2024-general-elections-matdar-sangh-nikal-news-candidates-winners-list-and-their-constituencies-mva-mahayuti-shivsena-ubt-ncp-sp-bjp-know-all-nivadnuk-events-in-marathi-bam92

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये कुणाचे किती उमेदवार विजयी झाले होते?

  • एनडीए- ३५४ (भाजप- ३०३)

  • यूपीए- ९१ (काँग्रेस- ५२)

  • राष्ट्रीय मोर्चा, महाआघाडी, डावी आघाडी, मुक्त आघाडी- ९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com