Lok Sabha Election Voting : अंदाज बांधता न येणारी निवडणूक

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील चुरस कधी नव्हती तेवढी यंदा झाली. वास्तविक पारनेरचे आमदार नीलेश लंके हे लोकसभा निवडणूक कधी लढतील, असे वाटत नव्हते. पण,
Lok Sabha Election Voting
Lok Sabha Election Votingsakal

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील चुरस कधी नव्हती तेवढी यंदा झाली. वास्तविक पारनेरचे आमदार नीलेश लंके हे लोकसभा निवडणूक कधी लढतील, असे वाटत नव्हते. पण, काही महिन्यांपूर्वी त्यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आणि झालेही तसेच. जर लंके उमेदवार नसते, तर डॉ. सुजय विखे पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असते. दक्षिणेतील पाण्याचा प्रश्‍न, शेती, बेरोजगारी, साकळाई पाणीयोजनेसारखे मुद्दे गाजले.

राष्ट्रीय मुद्दे गाजले नाहीत, तर दुसरीकडे विखे पाटील हे वजनदार नेते. गरीब विरुद्ध श्रीमंत, असा रंगही लंकेंनी प्रचारात दिला. तसेच लंकेंच्या गुन्हेगारी आणि दहशतीवरही विखे पाटील यांनी प्रहार केले. निवडणूक कशी जिंकायची, याचा अनुभव पाठिशी असलेल्या विखे पाटील घराण्याला मात्र ही निवडणूक तशी सोपी गेली नाही. लंकेंचा विचार केला तर ते जिंकले काय किंवा हरले काय, त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. या मतदारसंघात कोण निवडून येईल, याचा अंदाज बांधता येत नाही.

  • दक्षिणेतील पाण्याचा प्रश्‍न, शेती, बेरोजगारी, साकळाई पाणी योजनेसारखे मुद्दे गाजले

  • शहरात पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती

  • बेरोजगारी, पाणीप्रश्नाविषयी शेतकरी आणि सामान्यांत नाराजी

शिर्डी : महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यातील सरळ सामना ‘वंचित’च्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यामुळे तिरंगी झाला. जनसंपर्कामुळे सुरवातीपासून वाकचौरे चर्चेत होते. लोखंडे यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे यांनी फौजफाटा धाडला.

त्याआधारे त्यांनी वाकचौरेंच्या तुलनेत बूथ मॅनेजमेंट उत्तम केले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका देऊ शकणारा रूपवते यांनी वेळ कमी असतानाही मतपेढीला गवसणी घालण्यात यश मिळविले. त्यामुळे या तिरंगी सामन्यात ‘वंचित’च्या कामगिरीचा निकालावर परिणाम होऊ शकतो. कोपरगाव, शिर्डी आणि अकोल्यातून लोखंडेंना मताधिक्याची अपेक्षा आहे. वाकचौरे बूथ मॅनेजमेंट करण्यात तुलनेत ते मागे राहिले. पण महायुतीबाबतची ‘अॅन्टीइन्कबन्सी’ त्यांच्या पथ्यावर पडली. संगमनेर, श्रीरामपूर व नेवासे मतदारसंघातून त्यांना मताधिक्याची अपेक्षा आहे. रूपवते यांना प्रचाराला वेळ कमी मिळाला. मात्र त्यातही त्यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकरांच्या प्रचारसभा आयोजित केल्या.

  • ग्रामीण भागातील टंचाई परिस्थितीने लोखंडे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोष

  • रूपवते यांना प्रचाराला वेळ कमी मिळाला

  • जनसंपर्कामुळे सुरुवातीपासून वाकचौरे चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com