Lok Sabha elections results 2024: चारशे पारचं स्वप्न अधुरं... पण मोदीच पुन्हा पंतप्रधान? जाणून घ्या विजेत्या खासदारांची संपूर्ण लिस्ट

lok sabha election 2024 results bjp pm narendra modi congress rahul gandhi : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विकासाच्या मुद्यावरून सुरू झालेला या प्रचाराला दुसऱ्या टप्प्यात जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे वळण मिळाले. संपत्तीच्या फेरवाटपाच्या मुद्यावरून विरोधकांची विचारधारा ‘नक्षलवादी सोच’ ठरविणाऱ्या पंतप्रधान मोदींनी ‘इंडिया’ आघाडीची नजर स्त्रीधनावर (मंगळसूत्र) असल्याचा आरोप केला.
narendra modi rahul gandhi lok sabha election 2024
narendra modi rahul gandhi lok sabha election 2024esakal

Lok sabha final result 2024 : देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्याचं दिसून येत होतं. तर इंडिया आघाडी दीडशे जागांच्या आसपास उमेदवार निवडून आणू शकेल, असं सांगितलं गेलं होतं. परंतु प्रत्यक्ष इंडिया आघाडीने उसळी मारल्याचं चित्र असून एनडीएच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे.

देशामध्ये लोकसभेच्या ५४३ जागा आहेत. त्यापैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने ५४१ जागांचे निकाल हाती आले आहेत. २०२९च्या निवडणुकीमध्ये एकट्या भाजपने ३०३ जागांचा टप्पा गाठला होता. यावेळी भाजपकडून 'चारशे पार'चा नारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र एनडीएने ३०० चा आकडा पार केलेला नाही.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात विकासाच्या मुद्यावरून सुरू झालेला या प्रचाराला दुसऱ्या टप्प्यात जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे वळण मिळाले. संपत्तीच्या फेरवाटपाच्या मुद्यावरून विरोधकांची विचारधारा ‘नक्षलवादी सोच’ ठरविणाऱ्या पंतप्रधान मोदींनी ‘इंडिया’ आघाडीची नजर स्त्रीधनावर (मंगळसूत्र) असल्याचा आरोप केला. पुढच्या टप्प्यात त्यांनी धर्मावर आधारित आरक्षणाचा काँग्रेसचा डाव असल्याचे टीकास्त्र सोडले होते. त्यानंतरच्या सगळ्याच टप्प्यांमध्ये धार्मिक मुद्दे, आरक्षणाचे मुद्दे उपस्थित झाल्याचं बघायला मिळालं. दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले. पंतप्रधानांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतींवरुनही विरोधकांनी टीकास्र सोडलं होतं.

'या' मुद्द्यांनी प्रचार तापवला

मच्छी आणि मटण - श्रावण सुरू असतानाच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे मासे खात असतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर मोदींनी विरोधकांची मनोवृत्ती मुघलांची असल्याची टीका केली. भावना दुखावण्यासाठीच ‘मच्छी व मटण’ खात असल्याचे मोदी म्हणाले.

मंगळसूत्र- हिंदू महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेत घुसखोरांना त्याचे वाटप करण्याचे आश्‍वासन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात दिले आहे, असा आरोप मोदींनी केला होता. या मुद्द्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले.

दो शहजादे- उत्तर प्रदेशमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी,‘लांगुलचालनाचे राजकारण करण्यासाठी दोन शहजादे एकत्र आले आहेत,’ अशी टीका केली होती. त्यांचा रोख राहुल गांधी आणि ‘सप’चे प्रमुख अखिलेश यादव यांच्याकडे होता.

कळसूत्री राजा- काँग्रेसला अदानी आणि अंबानींकडून टेम्पो भरून पैसे मिळाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावर टीका करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी हे ‘टेम्पो अब्जाधीशां’चा ‘कळसूत्री राजा’ असा टोला मारला होता. या मुद्द्यांनी यावेळच्या निवडणुकीचा प्रचार भलताच गाजला.

प्रचारसभांमध्ये गाजलेले इतर शब्द

झुठों का सरदार : मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना उद्देशून

अमूल बेबी : हिमंता बिस्व सरमा यांनी प्रियांका आणि राहुल गांधींना उद्देशून

कागदी मुख्यमंत्री : मोदी यांनी भगवंत मान यांना उद्देशून

बडा पप्पू, छोटा पप्पू : कंगना राणावत यांनी राहुल गांधी व विक्रमादित्य सिंह (उमेदवार) यांना उद्देशून

घोटाळेबाजांचे संमेलन: पंतप्रधान यांनी ‘इंडिया’ आघाडीला उद्देशून

भटकती आत्मा: मोदींचे शरद पवारांना उद्देशून वक्तव्य

राज्यानुसार लोकसभेच्या जागा

आंध्र प्रदेश- ४२

अरुणाचल प्रदेश- २

आसाम- १४

बिहार- ४०

छत्तीसगड- ११

गोवा- २

गुजरात- २६

हरियाणा- १०

हिमाचल प्रदेश- ४

जम्मू-काश्मीर- ६

झारखंड- १४

कर्नाटक- २८

केरळ- २०

मध्य प्रदेश- २९

महाराष्ट्र- ४८

मणिपूर- २

मेघालय- २

मिझोरम- १

नागालँड- १

ओडिशा- २१

पंजाब- १३

राजस्थान- २५

सिक्कीम- १

तमिळनाडू- ३९

तेलंगणा- १७

त्रिपुरा- २

उत्तराखंड- ५

उत्तर प्रदेश- ८०

पश्चिम बंगाल- ४२

केंद्रशासित प्रदेश

अंदमान-निकोबार- १, चंदीगड- १, दादरा नगर हवेली- १, दिल्ली- ७, दिव दमन- १, लक्षद्विप- १, पुद्दुचेरी- १

२०२४ मध्ये कुठे किती मतदान झाले?

आंध्र प्रदेश- २५ टक्के

अरुणाचल प्रदेश-७७.६८ टक्के

आसाम- ८१.६२ टक्के

बिहार- टक्के

छत्तीसगड- ७२.१७ टक्के

गोवा- ७६.६ टक्के

गुजरात- ६०.१३ टक्के

हरियाणा- ६४.८० टक्के

हिमाचल प्रदेश- ७०.९० टक्के

झारखंड-

कर्नाटक- ७०.६४ टक्के

केरळ- ७१.२७ टक्के

मध्य प्रदेश- ६६.८७ टक्के

महाराष्ट्र- ६१.२९ टक्के

मणिपूर- ८०.४७ टक्के

मेघालय- ७६.६० टक्के

मिझोरम- ५६.८७ टक्के

नागालँड- ५७.७२ टक्के

ओडिशा- ७४.५१ टक्के

पंजाब- ६२.८० टक्के

राजस्थान- ६१.३४ टक्के

सिक्कीम- ७९.७८ टक्के

तमिळनाडू- ६९.७२ टक्के

तेलंगणा- ६५.६७ टक्के

त्रिपुरा- ८०.९२ टक्के

उत्तराखंड- ५७.२२ टक्के

उत्तर प्रदेश- ५६.९२

पश्चिम बंगाल-

केंद्रशासित प्रदेश

अंदमान-निकोबार- ६४.१० टक्के

चंदीगड- ६७.९८ टक्के,

दादरा नगर हवेली आणि दिव दमन ७१.३१ टक्के

दिल्ली- ५८.६९ टक्के

जम्मू-काश्मीर- ५८.५८ टक्के

लडाख- ७१.८२ टक्के

लक्षद्विप- ८४.१६ टक्के

पुद्दुचेरी- ७८.९० टक्के

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये कुणाचे किती उमेदवार विजयी झाले होते?

  • एनडीए- ३५४ (भाजप- ३०३)

  • यूपीए- ९१ (काँग्रेस- ५२)

  • राष्ट्रीय मोर्चा, महाआघाडी, डावी आघाडी, मुक्त आघाडी- ९७

2024- लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार

वाराणसी-नरेंद्र मोदी बीजेपी

गांधीनगर-अमित शाह बीजेपी

रायबरेली-राहुल गांधी कांग्रेस

अमेठी-किशोरीलाल शर्मा कांग्रेस

गुना-ज्योतिरादित्य सिंधिया बीजेपी

तिरुवनंतपुरम-शशि थरूर कांग्रेस

बहरमपुर-यूसुफ पठान टीएमसी

लखनऊ-राजनाथ सिंह बीजेपी

हैदराबाद-असदुद्दीन ओवैसी एआईएमआईएम

सुलतानपुर-रामभुआल निषाद सपा

जालंधर-चरणजीत सिंह चन्नी कांग्रेस

मंड्या-एचडी कुमारास्वामी जेडीएस

नागौर-हनुमान बेनीवाल आरएलपी

आरा सुदामा प्रसाद भाकपा

मंडी-कंगना रनौत बीजेपी

हासन-श्रेयस पटेल कांग्रेस

धारवाड़-प्रह्लाद जोशी बीजेपी

मैनपुरी-डिंपल यादव सपा

खीरी-उत्कर्ष वर्मा मधुर सपा

बारामूला-अब्दुल राशिद शेख निर्दलीय

मुंबई नार्थ-वर्षा एकनाथ कांग्रेस

खदूर साहिब-अमृतपाल सिंह निर्दलीय

बाड़मेर-उम्मेदराम बेनीवाल कांग्रेस

पोरबंदर-मनसुख मंडाविया बीजेपी

डायमंड हार्बर-अभिषेक बनर्जी टीएमसी

विदिशा-शिवराज सिंह चौहान बीजेपी

हमीरपुर-अनुराग ठाकुर बीजेपी

सिरसा-कुमारी शैलजा कांग्रेस

अरुणाचल पश्चिम-किरेन रिजिजू बीजेपी

बारामती-सुप्रिया सुले-एनसीपी (SP)

अमरावती-बलवंत वानखेड़े कांग्रेस

गौतम बुद्ध नगर (नोएडा)-महेश शर्मा बीजेपी

जालौर-लुंबाराम बीजेपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com